सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरने खरेदी केली नवी लॅम्बॉर्गिनी सुपर कार, किंमत वाचून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 17:26 IST2021-08-18T17:22:36+5:302021-08-18T17:26:55+5:30
Juniour NTR : Automobiliardent नावाने इन्स्टाग्राम पेजवर या गाडीचे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी गाडीचे फोटो शेअर करत या गाडीची माहिती दिली आहे.

सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरने खरेदी केली नवी लॅम्बॉर्गिनी सुपर कार, किंमत वाचून व्हाल अवाक्
साउथचा सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरने (Juniour NTR) लक्झरी कार खरेदी केली आहे. Lamborghini Urus Graphite Capsule कार खरेदी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. ही कार देशात सोमवारी लॉन्च झाली. Automobiliardent नावाने इन्स्टाग्राम पेजवर या गाडीचे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी गाडीचे फोटो शेअर करत या गाडीची माहिती दिली आहे.
फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, देशातील पहिली लॅम्बॉर्गिनीने हैद्राबादमध्ये आपलं घर शोधलं आहे. ही कार ज्युनिअर एनटीआरच्या गॅरेजमध्ये उभी राहणार आहे. डिलिव्हरीच्या आधीची पहिली झलक. ही पोस्ट ज्युनिअर एनटीआरचा पब्लिसिस्ट महेश कोनेरूने शेअर केली आहे. भारतात Lamborghini Urus Graphite Capsule या कारच्या लिमिटेड एडिशन मॉडलची किंमत ३.१६ कोटी रूपये आहे.
वर्कफ्रन्टबाबत सांगायचं तर ज्युनिअर एनटीआर 'आरआरआर' सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. तो त्यासाठी सध्या रशियात आहे. सिनेमाचं शूटींग लवकरच संपणार आहे. या सिनेमात अभिनेता रामचरण हा सुद्धा दिसणार आहे. हा सिनेमा हिंदीतही डब होणार आहे. यात आलिया भट्ट, अजय देवगन, श्रिया शरण हे चेहरे दिसणार आहेत.
नुकताच त्याने या सिनेमाच दिग्दर्शक एसएस राजमौली यांच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. फोटोत तो 'आरआरआर'चं आयडी घालून दिसले होते.