हैदराबादमध्ये पत्नी आणि दोन मुलांसोबत आलिशान बंगल्यात राहतो JR NTR, पाहा RRR स्टारच्या घराची एक झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 04:18 PM2023-03-16T16:18:54+5:302023-03-16T16:28:28+5:30

ज्युनियर एनटीआर साऊथमधील महागड्या अभिनेत्यांपैकी एक आहे. ज्युनिअर एनटीआर अत्यंत लक्झरीस आयुष्य जगतो. आलिशान घर, फार्म हाउस, महागड्या गाड्यांचा ताफा त्याच्याकडे आहे.

JR NTR lives in a luxurious bungalow in Hyderabad with his wife and two children | हैदराबादमध्ये पत्नी आणि दोन मुलांसोबत आलिशान बंगल्यात राहतो JR NTR, पाहा RRR स्टारच्या घराची एक झलक

हैदराबादमध्ये पत्नी आणि दोन मुलांसोबत आलिशान बंगल्यात राहतो JR NTR, पाहा RRR स्टारच्या घराची एक झलक

googlenewsNext

ऑस्कारमध्ये आरआरआर या चित्रपटातील ''नाटू - नाटू'' या गाण्याला, बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत पुरस्कार मिळाले. साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं. ऑस्करमध्ये हजेरी लावल्यानंतर ज्युनिअर एनटीआर भारतात परतल असून त्याला चाहत्यांनी विमानतळावर घेरलं होतं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला.

ज्युनियर एनटीआर साऊथमधील महागड्या अभिनेत्यांपैकी एक आहे. ज्यांची फॅन फॉलोईंगही खूप जबरदस्त आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला या अभिनेत्‍याच्‍या आलिशान घराची झलक दाखवणार आहोत, ज्याची किंमत कोट्यवधी आहे..

फार कमी लोकांना माहित आहे की ज्युनियर एनटीआरचे पूर्ण नाव नंदा मूर्ती तारका रामा राव आहे. ते आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांचे नातू आहे. अभिनेता सुरुवातीपासूनच लक्झरी लाईफ्टस्टाईल जगतो.

हैदराबादमधील ज्युबिली हिल्समधील लक्झरी बंगल्यात ज्युनियर एनटीआर कुटुंबासमवेत राहतो. या घराची किंमत सुमारे 25 कोटी आहे. राम चरण आणि चिरंजीवी ज्युनियर हे एनटीआरचे शेजारी आहेत. याशिवाय बंगळुरु आणि कर्नाटकमध्येही त्यांच्याकडे अनेक लक्झरी घरे आहेत.

ज्युनियर एनटीआर 9999 क्रमांकास लकी मानते. त्याच्याकडे एकाच नंबरच्या बर्‍याच गाड्या आहेत. ज्युनियर एनटीआरने आपल्या कार बीएमडब्ल्यूच्या नोंदणीसाठी फॅन्सी नंबर 9999 वर 11 लाखांची बोली लावली होती.  त्याबद्दल तो खूप चर्चेत देखील आला होता.

Web Title: JR NTR lives in a luxurious bungalow in Hyderabad with his wife and two children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.