काय सांगता! 'आरआरआर'मध्ये Jr NTR ने चित्ता आणि अस्वलासोबत घेतली होती एन्ट्री? 'त्या' सीनबाबत मोठा खुलासा, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 12:39 PM2024-09-28T12:39:08+5:302024-09-28T12:45:07+5:30

ज्युनियर एनटीआरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत RRR सिनेमातील त्याच्या एका एन्ट्री सीनबद्दल मोठा खुलासा केला.

jr ntr talk about his entry scene in rrr with wild animal said people think its real | काय सांगता! 'आरआरआर'मध्ये Jr NTR ने चित्ता आणि अस्वलासोबत घेतली होती एन्ट्री? 'त्या' सीनबाबत मोठा खुलासा, म्हणाला...

काय सांगता! 'आरआरआर'मध्ये Jr NTR ने चित्ता आणि अस्वलासोबत घेतली होती एन्ट्री? 'त्या' सीनबाबत मोठा खुलासा, म्हणाला...

एस एस राजामौली दिग्दर्शित RRR सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी केली होती. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. RRR ने ऑस्कर पुरस्कारावरही नाव कोरलं होतं. राम चरण, ज्युनियर एनटीआर RRR सिनेमात मुख्य भूमिकेत होते. या सिनेमातील गाणी आणि कथेबरोबरच काही सीन्सची देखील प्रचंड चर्चा रंगली होती. ज्युनियर एनटीआरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत RRR  सिनेमातील त्याच्या एका एन्ट्री सीनबद्दल मोठा खुलासा केला. 

ज्युनियर एनटीआर सध्या त्याच्या आगामी 'देवरा पार्ट १' मुळे चर्चेत आहे. या सिनेमात ज्युनियर एनटीआरसह अभिनेत्री जान्हवी कपूर, सैफ अली खानही मुख्य भूमिकेत आहेत. देवरा सिनेमाच्या प्रमोशनसाठी ज्यु. एनटीआर, जान्हवी आणि सैफने द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत ज्यु. एनटीआर RRR मधील एका सीनबाबत मोठा खुलासा केला आहे. RRR मध्ये एका सीनमध्ये ज्यु. एनटीआर प्राण्यांच्या ट्रकमधून एन्ट्री घेताना दिसतो. या ट्रकचा दरवाजा उघडताच चित्ता, अस्वल अशा जंगलातील प्राण्यांबरोबर ज्यु. एनटीआरही बाहेर पडत असल्याचं दिसतं.  


हा सीन बघताना ते प्राणी खरे आहेत की खोटे? असा प्रश्न साहजिकच चाहत्यांना पडला होता. याबाबत ज्यु. एनटीआरला कपिलने प्रश्न विचारला. ज्यु. एनटीआर म्हणाला, "लोकांना वाटत होतं की भीमने चित्ता आणि अस्वलांबरोबर घेतलेली एन्ट्री खरी होती. मी आतमध्ये खऱ्या प्राण्यांबरोबर बसलो होतो, असं लोकांना वाटत होतं. अनेकांनी मला याबाबत विचारलं देखील आहे. पण, ही सगळी VFX ची कमाल आहे. तरीही लोकांना खरं वाटायचं नाही". 

Web Title: jr ntr talk about his entry scene in rrr with wild animal said people think its real

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.