'डर'साठी जुही चावला नाही तर या अभिनेत्रीची लागणार होती वर्णी, ३० वर्षांनी असा झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 01:52 PM2023-07-26T13:52:25+5:302023-07-26T15:58:16+5:30

'डर'मधील जुहीच्या भूमिकेला चांगलीच पसंती मिळाली होती. यश चोप्रांचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

Juhi chawla not aishwarya rai bachchan was first choice for shah rukh khan darr neeta lulla revealed | 'डर'साठी जुही चावला नाही तर या अभिनेत्रीची लागणार होती वर्णी, ३० वर्षांनी असा झाला खुलासा

'डर'साठी जुही चावला नाही तर या अभिनेत्रीची लागणार होती वर्णी, ३० वर्षांनी असा झाला खुलासा

googlenewsNext

शाहरुख खानने ३० वर्षांपूर्वी  1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'डर' चित्रपटात एका वेडसर प्रियकराची भूमिका साकारून प्रेक्षकांची तसेच समीक्षकांची मने जिंकली होती. शाहरुख, जुही चावला आणि सनी देओल स्टारर चित्रपट 24 डिसेंबर 1993 रोजी रिलीज झाला होता. यश चोप्राच्या चित्रपटात अनुपम खेर, तन्वी आझमीसारखे कलाकारही होते.आता या सिनेमासंदर्भात फॅशन डिझायनर नीता लुल्ला यांनी एक खुलासा केला आहे. निता म्हणाल्या डर सिनेमासाठी जुही चावला ही निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. 

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत नीता लुल्ला यांनी सांगितले की, त्या पहिल्यांदा यश चोप्राच्या ऑफिसमध्ये ऐश्वर्या रायला भेटल्या होत्या. यश चोप्रा आणि ऐश्वर्या डर चित्रपटाबद्दल बोलत होते. नीता यांनी सांगितले की, यश चोप्रा यांचा फोन आला, ते म्हणाले, ऐश्वर्यासोबत लुक टेस्ट करा. आम्ही तिची लुक टेस्ट केली, त्यात ती खूप सुंदर दिसत होती. पण या गोष्टी चालणार नाहीत हे यश चोप्रांना माहीत होते.

यश चोप्रा यांनी माहित होते की ऐश्वर्या मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी जाणार आहे. आणि ती यास्पर्धेसाठी गेली. त्यानंतर हा चित्रपट जुही चावलाच्या झोळीत आला. ऐश्वर्यानंतर शाहरुख खान आणि सनी देओलसोबत जुही चावला या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. शाहरुख खानने 'तू है मेरी किरण'... क..क.क.क..किरण हा डायलॉग ज्या पद्धतीने सादर केला आहे, त्याचे आजही कौतुक होत आहे. ३० वर्षांपूर्वी रिलीज झालेला 'डर' यश चोप्रा यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता.
 

Web Title: Juhi chawla not aishwarya rai bachchan was first choice for shah rukh khan darr neeta lulla revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.