Justin Bieber in Mumbai : जगातील सर्वात श्रीमंत पॉप सिंगर मुंबईमध्ये दाखल, अंबानीच्या लेकाच्या संगीत सोहळ्यात जस्टिन बीबर करणार परफॉर्म!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 10:22 AM2024-07-04T10:22:58+5:302024-07-04T10:51:06+5:30

मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Justin Bieber arrives in Mumbai for Anant Ambani-Radhika Merchant's wedding | Justin Bieber in Mumbai : जगातील सर्वात श्रीमंत पॉप सिंगर मुंबईमध्ये दाखल, अंबानीच्या लेकाच्या संगीत सोहळ्यात जस्टिन बीबर करणार परफॉर्म!

Justin Bieber in Mumbai : जगातील सर्वात श्रीमंत पॉप सिंगर मुंबईमध्ये दाखल, अंबानीच्या लेकाच्या संगीत सोहळ्यात जस्टिन बीबर करणार परफॉर्म!

मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सीईओ वीरेन मर्चंट आणि उद्योजिक शैला मर्चंट यांची लेक राधिका मर्चंट हिच्याशी अनंत अंबानी लग्नगाठ बांधणार आहे.  लग्न सोहळ्यातील प्रत्येक तपशील जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहे. या सोहळ्यासाठी जगभरातील पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. राधिका आणि अनंतच्या संगीत कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर जस्टिन बीबर परफॉर्म करणार आहे. 

जस्टिन बीबर मुंबईमध्ये दाखल झाला आहे. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.  हा व्हिडीओ viralbhayani या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आहे. या व्हिडीओमध्ये गाड्याचा ताफा दिसून येत आहे. पण, जस्टिन बीबरची झलक पाहायला नाही मिळाली. विमानतळापासून हॉटेलपर्यंत त्याच्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्याचं दिसून आलं. जस्टिन बीबरने अनंत राधिकाच्या संगीत कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी मोठी रक्कम घेतल्याचं बोललं जात आहे.

जस्टिन बीबर आवाजामुळे जगभरात लोकप्रिय आहे. जगातील सर्वात यशस्वी गायकांमध्ये त्यांचा समावेश होतो. या कॅनेडियन पॉप गायकाने वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी जगभरात जे स्थान मिळवले आहे, ते स्थान गाठणे प्रत्येकाच्या आवाक्यात नाही. जस्टिन बीबरच्या 'बेबी' गाण्याने भारतात इंग्रजी गाण्यांचा ट्रेंड वाढवाला होता. ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांच्याही ओठावर हे गाणं राहिलं होतं. जगभरात जस्टिनच्या गाण्यांची क्रेझ आहे.

अनंत आणि राधिकाच्या जामनगरमध्ये 1 ते 3 मार्च दरम्यान पार पडलेल्या प्री-वेडिंगमध्येही  देश-विदेशातील अनेक बड्या लोकांनी हजेरी लावली होती. या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये हॉलिवूड गायिका रिहाना हिनं परफॉर्म केलं होतं. रिहाना ही जगातील महागड्या कलाकारांपैकी आहे.   प्री-वेडिंग पार्टीमध्ये परफॉर्म करण्यासाठी रिहानाने मोठी रक्कम आकारली होती. आता अनंत आणि राधिकाचा संगीत सोहळा उजळून निघणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

Web Title: Justin Bieber arrives in Mumbai for Anant Ambani-Radhika Merchant's wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.