'कर्णसंगिनी' मालिकेत ज्योती गौबा साकारणार 'ही' भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 02:19 PM2018-10-25T14:19:15+5:302018-10-25T14:19:15+5:30
ज्योती गौबा स्टार प्लसवरील मालिका 'कर्णसंगिनी'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.
अभिनेत्री ज्योती गौबा यांनी आपल्या चित्रपट व मालिकांमधील अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. आता स्टार प्लसवरील मालिका 'कर्णसंगिनी'मध्ये त्या महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.
ज्योती यांनी नेहमीच आपल्या मालिकांमधून सकारात्मक भूमिका केल्या आहेत. आता प्रथमच त्यांच्या व्यक्तिरेखेला अनेक छटा असणार आहेत. त्या ऊरूवी तेजस्वी प्रकाशची आई राणी शुब्राची भूमिका साकारणार आहेत. ही भूमिका साकारण्यासाठी त्या खूप उत्सुक असून त्याबद्दल त्या म्हणाल्या की, ''कर्णसंगिनी'मध्ये शुब्राची भूमिका साकारण्याबद्दल मी खूप उत्साहात आहे. या भूमिकेला मी होकार दिला कारण सुरूवातीला ती एक प्रेमळ आणि काळजी घेणारी आई असेल आणि नंतर मात्र तिच्यामधीन पझेसिव्ह बाजू पाहायला मिळेल. हे खूपच मनोरंजक आहे. ऊरूवीची आई साकारणे खूप छान आहे कारण तेजस्वी अतिशय गोड मुलगी आहे.'
'कर्णसंगिनी' ही कविता काणे यांची कादंबरी 'कर्णाज् वाईफः दि आऊटकास्ट क्वीन'वर आधारित आहे. महाभारताच्या पार्श्वभूमीवरील 'कर्णसंगिनी' या मालिकेत सामाजिक प्रथेच्या विरोधात जाऊन जातीबाहेर टाकलेल्या राजा कर्णशी लग्न करणाऱ्या उरुवीची कथा सादर करण्यात आली आहे. महाकाव्य महाभारताची माहिती नसलेली बाजू या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यात कर्ण, उरुवी आणि अर्जुनाच्या प्रेमाच्या त्रिकोणाबद्दल प्रेक्षकांना जाणून घेता येणार आहे. कधीही सांगण्यात न आलेल्या कर्ण आणि त्याची जोडीदार उरुवीच्या या कथेमधून सर्व सामाजिक आणि वर्गांच्या मर्यादा लांघणारी प्रेमकथा पाहायला मिळेल. ही मालिका शशी सुमित प्रॉडक्शन्सनी बनवला असून यात अशिम गुलाटी कर्णाच्या रूपात, तेजस्वी प्रकाश ऊरूवीच्या रूपात तर किंशुक वैद्य अर्जुनाच्या रूपात दिसून येणार आहे.