इथे लोक केवळ खोटा आव आणतात...! गोविंदावर बिथरला कादर खान यांचा मुलगा सरफराज!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 10:37 AM2019-01-04T10:37:13+5:302019-01-04T10:38:30+5:30
कादर खान केवळ माझे ‘उस्ताद’ नव्हते तर माझ्या पित्यासारखे होते, असे गोविंदाने लिहिले. पण कादर खान यांचा मुलगा सरफराज याला मात्र गोविंदाचे हे शब्द जराही रूचले नाहीत.
गत ३१ डिसेंबरला बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला. बॉलिवूडनेही सोशल मीडियावर शोकसंवेदना व्यक्त केल्या. अभिनेता गोविंदा यानेही इन्स्टाग्रामवर कादर खान यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत, त्यांना वडिलांचा दर्जा दिला. कादर खान केवळ माझे ‘उस्ताद’ नव्हते तर माझ्या पित्यासारखे होते, असे गोविंदाने लिहिले. पण कादर खान यांचा मुलगा सरफराज याला मात्र गोविंदाचे हे शब्द जराही रूचले नाहीत.
गोविंदा माझ्या वडिलांना पित्यासारखा मानायचा तर त्यांची प्रकृती बिघडल्यावर गोविंदाने त्यानां कितीदा फोन केला? इतक्या वर्षांत त्याने कितीदा त्यांची विचारपूस केली? असा संतप्त सवाल सरफराजने केला. गोविंदाने ना माझे वडिल हयात असतानां त्यांची चौकशी केली, ना ते गेल्यावर आम्हाला एक फोन करून सांत्वना व्यक्त करण्याचे सौजन्य दाखवले. हे चित्रपटसृष्टीचेच वास्तव आहे. इथे कुणीच खरे नाही. सगळे केवळ खोटा आव आणतात, असे सरफराज आएएनएसला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
Canada: #Visuals from veteran actor & screenwriter Kader Khan's funeral ceremony held in Mississauga yesterday. He passed away at the age of 81 in a hospital in Toronto on January 1 pic.twitter.com/08TPt8AWMg
— ANI (@ANI) January 3, 2019
सरफराज पुढे म्हणाला की, इंडस्ट्रीतील अनेकांशी माझ्या वडिलांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. पण एकचं अशी व्यक्ति होती, जी माझ्या वडिलांना प्रचंड आवडायची, ती व्यक्ति म्हणजे, बच्चन साहब(अमिताभ बच्चन). इडस्ट्रीतील कुणाची तुम्हाला सर्वाधिक आठवण येते, असे मी नेहमी त्यांना विचारायचो. यावर ते बच्चन साहब, हे एकच नाव घ्यायचे. माझ्या वडिलांनी अखेरच्या काळापर्यंत बच्चन साहेबांची आठवण काढली, हे बच्चन साहेबांपर्यंत पोहोचावे, अशी माझी इच्छा आहे.
T 3045 - Kadar Khan passes away .. sad depressing news .. my prayers and condolences .. a brilliant stage artist a most compassionate and accomplished talent on film .. a writer of eminence ; in most of my very successful films .. a delightful company .. and a mathematician !! pic.twitter.com/l7pdv0Wdu1
— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 1, 2019
अमिताभ बच्चन व गोविंदा या दोघांसोबतही कादर खान यांनी काम केले. अमिताभ यांच्या बहुतांश गाजलेल्या चित्रपटाच्या पटकथा कादर खान यांनीच लिहिल्या. हिरो नंबर १ , अनाडी नंबर १,जोरू का गुलाम, अखियोंसे गोली मारे, दुल्हे राजा,हसीना मान जायेगी, आँटी नंबर १ यांसारख्या चित्रपटात कादर खान आणि गोविंदा यांनी एकत्र काम केले.गोविंदाची प्रमुख भूमिका असलेल्या कुली नंबर १, राजा बाबू, साजन चले ससुराल यांसारख्या चित्रपटांच्या कथाही त्यांनी लिहिल्या.