कुठे गायब झाला काजोलच्या पहिल्या चित्रपटाचा हा हिरो?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 08:00 AM2019-08-04T08:00:00+5:302019-08-04T08:00:02+5:30
अभिनेत्री काजोलचा 1992 साली प्रदर्शित ‘बेखुदी’ या चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. म्हणजेच हा काजोलचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटानंतर काजोलने आपल्या फिल्मी करिअरमध्ये बराच मोठा पल्ला गाळला. पण या चित्रपटातील तिचा हिरो मात्र काळासोबत फिल्म इंडस्ट्रीतून गायब झाला.
अभिनेत्री काजोलचा 1992 साली प्रदर्शित ‘बेखुदी’ या चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. म्हणजेच हा काजोलचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटानंतर काजोलने आपल्या फिल्मी करिअरमध्ये बराच मोठा पल्ला गाळला. पण या चित्रपटातील तिचा हिरो मात्र काळासोबत फिल्म इंडस्ट्रीतून गायब झाला. हा हिरो कोण तर अभिनेता कमल सदाना.
कमलने पर्सनल लाईफमध्ये अनेक संकटांचा सामना केला. त्याचे वडिल बृज सदाना यांनी कमलच्या डोळ्यासमोर त्याच्या आई व बहीणीची हत्या केली होती. वडिलांनी कमलवरही गोळी चालवली होती. पण या हल्ल्यातून कमल थोडक्यात बचावला होता.
कमलने एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. माझ्या आईवडिलांमध्ये सतत भांडणे व्हायची. त्यादिवशी माझा वाढदिवस होता. माझ्या 20 व्या वाढदिवसाच्या दिवशीच माझ्या वडिलांनी आधी आईवर आणि नंतर माझ्या बहिणीवर गोळ्या झाडल्या. त्या दोघींचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. नंतर माझ्या वडिलांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. हे सगळे माझ्या डोळ्यांसमोर घडले. आई व बहिणीच्या हत्येचे दृश्य अनेकवर्षे माझ्या डोळ्यांसमोर येई. मी यानंतर अनेक वर्षे डिप्रेशनमध्ये गेलो होतो.यादरम्यान कमलने मेकअप आर्टिस्ट लीसा जॉनसोबत लग्न केले.
कमलने ‘बेखुदी’शिवाय रंग,बाली उमर को सलाम, रॉक डान्सर, हम सब चोर है, कर्कश, व्हिक्टोरिया नंबर 203 अशा अनेक चित्रपटांत काम केले.
कमल आणि सैफ अली खानची चांगली मैत्री होती. सैफचे वडिल मन्सूर अली खान यांच्या निधन झाले तेव्हा सैफने ‘पगडी सेरेमनी’साठी कमलला बोलवले होते. पण स्वत:च्या लग्नात मात्र त्याने कमलला बोलवले नाही.
कमल सध्या दिग्दर्शक क्षेत्रात सक्रीय आहे. 2014 मध्ये प्रदर्शित ‘Roar’ या सिनेमाचे दिग्दर्शन त्याने केले होते. अॅक्टिंग सोडून मी आनंदी आहे, असे कमल अलीकडे म्हणाला होता.