तर वेळेनुसार असे बदलतात काजोलचे मुड, फोटोंवर मिळतायेत अशा कमेंटस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 04:34 PM2020-10-31T16:34:43+5:302020-10-31T16:35:06+5:30
'तान्हाजी' सिनेमात तिने छोटीशी पण लक्षवेधी भूमिका साकारली होती. काजोल सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. मुलांकडून सोशल मीडियाविषयी अधिक माहिती मिळते त्यानुसार ती तिचे फोटो व्हिडीओ चाहत्यांसह शेअर करत असते.
रसिकांची लाडकी अभिनेत्री म्हणजे काजोल. ९० च्या दशकातआपल्या भूमिकेने तिने रसिकांना अक्षरक्षः वेड लावलं होतं. मात्र मुंलाच्या जन्मानंतर काजोल घरसंसारात बिझी झाली आणि बॉलिवूडपासून काही काळासाठी तिने ब्रेक घेतला होता. मातृत्वाची जबाबदारी पार पडल्यानंतर अभिनेत्री काजोल पुन्हा एकदा अभिनयाच्या मैदानात उतरली आहे.
'तान्हाजी' सिनेमात तिने छोटीशी पण लक्षवेधी भूमिका साकारली होती. काजोल सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. मुलांकडून सोशल मीडियाविषयी अधिक माहिती मिळते त्यानुसार ती तिचे फोटो व्हिडीओ चाहत्यांसह शेअर करत असते. मनमौजी अशी काजोल आहे.
ख-या आयुष्यात काजोल प्रत्येक छोट्यातल्या छोट्या गोष्टींचा आनंद घेत एन्जॉय करणारी आहे. नुकतेच तिने तिचे मुड कसे बदलतात त्याविषयीचे तिचे फोटो शेअर केले आहे. हे फोटो पाहून तिचे चाहते लाईक्स आणि कमेंटस देत आपल्या प्रतिक्रीया देत आहेत.
प्रेम जुळवता जुळवता अजय देवगण स्वतःच अडकला काजोलच्या प्रेम जाळ्यात, जाणून घ्या हटके लव्हस्टोरी
काजोलने कित्येक मुलाखतीत अजय देवगणबद्दल सांगितले आहे की, ती व तिचा नवरा अजय देवगण यांच्या स्वभावात खूप तफावत आहे. काजोल खूप चुलबुली आहे तर अजय खूप शांत. तरीदेखील त्यांच्यात खूप छान केमिस्ट्री आहे आणि त्यांचा संसार सुरळीत चालू आहे.
अजय देवगण व काजोल यांची पहिली भेट 1995 साली झाली होती हलचलच्या सेटवर. त्या दरम्यान त्या दोघांमध्ये एवढी बातचीत झाली नव्हती कारण त्या दोघांचे स्वभाव खूप वेगळे होते. मुलाखतीत अजय देवगणने सांगितले की, काजोल त्याला बडबडी व उद्धट वाटली होती. दुसऱ्यांदा तर त्याला तिला भेटायचेदेखील नव्हते. पण काजोलला एका सीन दरम्यान वाटले की अजय तिच्या जीवनातील महत्त्वाचा हिस्सा बनणार आहे.
पुढचे दोन वर्षे ते एकमेकांना भेटले नाहीत. अजय दुसऱ्या कोणाला तरी डेट करत होता आणि काजोलदेखील दुसऱ्या मुलासोबत रिलेशनशीपमध्ये होती. पण काही वर्षांनंतर ते भेटले आणि मग त्यांच्यात मैत्री झाली.अजय काजोलसोबत तासन तास बसायचा आणि काजोल तिच्या नात्यातील प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सल्ला देत होता. काजोलला देखील तिच्या रिलेशनशीपमधील समस्या त्याच्याशी शेअर करायला आवडत होते.