अजय देवगणच्या आधी एका अभिनेत्याला डेट करत होती काजोल, अभिनेत्रीचा वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 04:56 PM2023-04-13T16:56:38+5:302023-04-13T16:57:15+5:30
Kajol And Ajay Devgn : काजोल आणि अजय देवगण हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडप्याने २४ वर्षांपूर्वी लग्न केले होते.
काजोल आणि अजय देवगण हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडप्याने २४ वर्षांपूर्वी लग्न केले होते. पण आता काजोलने खुलासा केला आहे की, अजय देवगणच्या आधी ती दुसऱ्या एका अभिनेत्याला डेट करत होती. दोघांनी एकत्र चित्रपटही केले होते, मात्र काही काळानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. जरी अभिनेता आणि काजोल नंतरही चांगले मित्र राहिले. काजोलने तिच्या ताज्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे.
काजोलने अलीकडे ह्युमन्स ऑफ बॉम्बे या वेबसाईटला मुलाखत दिली आहे. यादरम्यान तिने आपल्या फिल्मी करिअर व्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप काही सांगितले. काजोलने चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा एका अभिनेत्याला भेटलेला काळ आठवला. काजोल म्हणाली, 'मी कोणासोबत तरी बाहेर जात होते आणि मला वाटते की तोही त्या वेळी कोणासोबत बाहेर जात होता. आम्ही एकत्र चित्रपट केला आणि तिथूनच आमची मैत्री झाली.
काजोल पुढे म्हणाली, 'हे सर्व चालू राहिले. आम्ही बोलू लागलो, मग मित्र झालो, मग शेवटी आमचे ब्रेकअप झाले आणि आम्ही मित्र बनलो. याशिवाय काजोलने इतरही अनेक गोष्टींचा या मुलाखतीत खुलासा केला आहे.
१९९५ मध्ये ‘हलचल’ चित्रपटादरम्यान अजय आणि काजोलची पहिली भेट झाली होती. अजय आणि काजोलने चार वर्ष एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अजयच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नासाठी होकार दिला होता. मात्र काजोलने घरी सांगताच तिच्या वडिलांनी तिच्यासोबत चार दिवस बोलणे बंद केले होते.काजोलने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करावे असे तिच्या वडिलांना वाटत होते. पण नंतर काही दिवसांनी काजोलच्या घरातील देखील लग्नासाठी तयार झाले. त्यांनी १९९९मध्ये लग्न केले. अतिशय खासगी पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पाडला. अभिनेत्री काजोल शेवटची सलाम वेंकी या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात काजोलसोबत अभिनेता विशाल जेठवाही मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.