सासऱ्यांच्या निधनानंतर बिघडली काजोलची आई तनुजा यांची तब्येत, रुग्णालयात केले दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 10:18 AM2019-05-29T10:18:38+5:302019-05-29T10:20:11+5:30
देवगण कुटुंब सध्या दु:खात आहेत. सोमवारी अचानक अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचे निधन झाले. या दु:खातून देवगण कुटुंब सावरायचे असताना मंगळवारी संध्याकाळी काजोल मुंबईच्या एका रूग्णालयाबाहेर दिसली. यादरम्यान ती प्रचंड चिंतेत होती.
देवगण कुटुंब सध्या दु:खात आहेत. सोमवारी अचानक अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांचे निधन झाले. सोमवारी सकाळी वीरू देवगण अचानक बसल्या बसल्या खाली कोसळले. त्यांना रूग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. या दु:खातून देवगण कुटुंब सावरायचे असताना मंगळवारी संध्याकाळी काजोल मुंबईच्या एका रूग्णालयाबाहेर दिसली. यादरम्यान ती प्रचंड चिंतेत होती. प्राप्त माहितीनुसार, काजोलची आई तनुजा यांची प्रकृती ठीक नाही. त्यांना मुंबईच्या लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांनी गेल्या काही दिवसांपासून श्वास घ्यायला त्रास जाणवत होता. यानंतर काजोल आणि कुटुंबाने त्यांना रूग्णालयात भरती करण्याचा निर्णय घेतला. वृत्त लिहिपर्यंत तनुजा यांच्या प्रकृतीबद्दलचे कुठलेही अपडेट्स मिळू शकले नाहीत.
तूर्तास सोशल मीडियावर काजोलचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत काजोलचा चिंताग्रस्त चेहरा स्पष्ट दिसतोय. वीरू देवगण यांच्या निधनाने काजोल आधीच खचली आहे. सासºयांसोबत काजोलचे अतिशय सुंदर नाते होते.
वीरू देवगण नेहमी अजय आणि काजोलसोबत अनेकवेळा सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावत असत. त्यामुळेच त्यांच्या अंत्ययात्रेला काजोलला अश्रू अनावर झाले. काजोल ऐश्वर्या रायला मिठी मारून अगदी लहान मुलासारखी ओक्सबोक्शी रडली. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन दोघेही काजोलला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. पण तिला समजावणे कोणालाच शक्य नव्हते. अशात आई आजारी असल्याने काजोल पुन्हा एकदा हळवी झालेली आहे. वीरू देवगण यांच्यावर विलेपार्लेच्या पश्चिमेला असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. वीरू देवगण यांनी अनिता या सिनेमातून स्टंटमॅन म्हणून डेब्यू केले होते. यानंतर त्यांनी लाल बादशाह, प्रेमगंथ, दिलवाले, जिगर, शहेनशाह आणि मिस्टर इंडिया या सिनेमातून काम केले