'कल्कि २८९८ एडी'मध्ये 'या' लोकप्रिय अभिनेत्रीने दीपिका पादुकोणचा आवाज तेलुगू भाषेत केलाय डब

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 05:48 PM2024-07-01T17:48:33+5:302024-07-01T17:48:57+5:30

'कल्कि २८९८ एडी'मध्ये दीपिका पादुकोणचा तेलुगू आवाज या अभिनेत्रीने केलाय डब. तुम्ही ओळखलं? (kalki 2898 ad)

Kalki 2898 Ad Popular actress sobhita dhulipala Dubbed Deepika Padukone's voice in Telugu | 'कल्कि २८९८ एडी'मध्ये 'या' लोकप्रिय अभिनेत्रीने दीपिका पादुकोणचा आवाज तेलुगू भाषेत केलाय डब

'कल्कि २८९८ एडी'मध्ये 'या' लोकप्रिय अभिनेत्रीने दीपिका पादुकोणचा आवाज तेलुगू भाषेत केलाय डब

 'कल्कि २८९८ एडी' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सिनेमाची भन्नाट कथा, टिझर-ट्रेलरने प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवली होती. सिनेमा रिलीज होताच 'कल्कि २८९८ एडी' मध्ये दीपिका पादुकोणने साकारलेली भूमिका चांगली गाजतेय. अशातच 'कल्कि २८९८ एडी' अनेक भाषांमध्ये डब झालाय. त्यापैकी तेलुगू भाषेत दीपिकाचा आवाज एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने डब केलाय. ही अभिनेत्री कोण आहे जाणून घ्या.

या अभिनेत्रीने दीपिकाचा आवाज तेलगूमध्ये केलाय डब

 'कल्कि २८९८ एडी' मध्ये दीपिका पादुकोणने विशेष भूमिका सर्वांच्या लक्षात राहतेय. सिनेमा पाहून आल्यावर लोक दीपिकाचं कौतुक करत आहेत. हा सिनेमा भारतभर विविध भाषांमध्ये रिलीज झालाय. यापैकी तेलुगू भाषेत दीपिकाचा आवाज अभिनेत्री शोभिता धुलीपालाने डब केलाय. शोभिताची मातृभाषा तेलुगू आहे. त्यामुळे दीपिकाच्या संवादांमधील बारकाव्यांसह शोभिताने तिचा आवाज डब केलाय. शोभिताने इतका चपखल आवाज डब केलाय की स्वतः दीपिकाच तिचे तेलुगू संवाद म्हणालीय, असा भास होतो. हे शोभिताच्या डबींगचं यश म्हणावं लागेल.

'कल्कि २८९८ एडी'चा बॉक्स ऑफिस रिपोर्ट

'कल्कि २८९८ एडी' सिनेमाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय.  Sacnilk  च्या अहवालानुसार, सिनेमाने रिलीजच्या ४ दिवसांतच ३०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी ९५.३ कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी ५७.६ कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी ६४.५ कोटी रुपये कमावले आहेत आणि चौथ्या दिवशी ८५ कोटी रुपये कमावल्याचा अंदाज आहे. याशिवाय जगभरात सिनेमाने चांगली कमाई केली असून सिनेमाच्या जगभरातल्या बॉक्स ऑफिसवर ४०० कोटी पार केले आहेत.

Web Title: Kalki 2898 Ad Popular actress sobhita dhulipala Dubbed Deepika Padukone's voice in Telugu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.