Kamaal R Khan : संघाला माझी गरज असेल तर मी..., केआरकेला आरएसएसमध्ये व्हायचंय सामील, वाचा ट्वीट  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 10:51 AM2022-09-19T10:51:31+5:302022-09-19T10:54:44+5:30

Kamaal R Khan : नुकतंच केआरकेने राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता काय तर त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसमध्ये सामील होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

kamaal r khan aka krk tweet if rss needs i am ready to join anytime | Kamaal R Khan : संघाला माझी गरज असेल तर मी..., केआरकेला आरएसएसमध्ये व्हायचंय सामील, वाचा ट्वीट  

Kamaal R Khan : संघाला माझी गरज असेल तर मी..., केआरकेला आरएसएसमध्ये व्हायचंय सामील, वाचा ट्वीट  

googlenewsNext

बॉलिवूडचा स्वयंभू समीक्षक व अभिनेता कमाल आर खान (Kamaal R Khan) अर्थात केआरके (KRK) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बॉलिवूडला डिवचण्याची एकही संधी केआरके सोडत नाही. वादग्रस्त ट्वीट करून चर्चेत राहणं केआरकेला चांगलंच जमतं. पण काही दिवसांपूर्वी अशाच एका वादग्रस्त ट्वीटप्रकरणी केआरकेला तुरुंगात जावं लागलं. याप्रकरणी सध्या तो जामिनावर आहे. तुरुंगातून बाहेर आल्यावर केआरकेनं पुन्हा एकदा ट्वीटचा सपाटा लावला आहे. नुकतंच त्याने राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता काय तर त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसमध्ये सामील होण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. केवळ इतकंच नाही तर  त्यासाठी त्याने सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडं घातलं आहे.
केआरके नुकतंच मोहन भागवत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत ट्वीट केलं आहे.

‘संघाला माझी गरज असेल तर मी निश्चितच आरएसएसमध्ये यायला तयार आहे,’असं ट्वीट केआरकेनं केले आहे. सध्या त्याच्या या ट्वीटवरून नेटकरी त्याची चांगलीच मजा घेताना दिसत आहेत. काहींनी त्याच्यावरचे मीम्सही व्हायरल केले आहेत. ‘बचने का आखरी रास्ता,’असं त्याच्या ट्वीटवर कमेंट करताना एका युजरने लिहिलं आहे.

‘भाजपात जाण्यापर्यंत ठीक होतं. पण एकदम आरएसएस. पचायला जड जातंय यार, म्हणजे काहीही, ’अशी कमेंट एका युजरने केली आहे.‘ट्विटरवर आरएसएस जॉइन करता येत नाही त्यासाठी नागपूरला जावं लागेल’, असं म्हणत अनेकांनी त्याच्या या ट्वीटची खिल्ली उडवली आहे.

तुरुंगातून बाहेर आल्यावर केआरकेचा राजकारणातील इंटरेस्ट वाढला आहे. ‘मी लवकरच राजकीय पक्षात प्रवेश करण्याचा विचार करत आहे. कारण देशात सुरक्षित राहण्यासाठी अभिनेता नाही तर नेता असंण आवश्यक आहे,’ असं ट्वीट त्याने नुकतंच केलं होतं.
 केआरके वादग्रस्त  ट्वीटमुळेच जास्त चर्चेत असतो. काही वर्षांआधी त्याने दिवंगत अभिनेते ऋषि कपूर आणि इरफान खान यांच्याबद्दल वादग्रस्त ट्वीट केलं होतं. त्याच प्रकरणी त्याला अटक झाली होती.  

Web Title: kamaal r khan aka krk tweet if rss needs i am ready to join anytime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.