सुपरस्टार कमल हसन तब्येतीच्या कारणाने रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 09:24 AM2022-11-24T09:24:21+5:302022-11-24T09:45:08+5:30

सुपरस्टार कमल हसन यांना तब्येतीच्या कारणामुळे काल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.श्री रामचंद्र मेडिकल सेंटर मध्ये ते  उपचार घेत आहेत. रेग्युलर चेकअप साठी त्यांना ते रुग्णालयात दाखल असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

kamal-hasan-admitted-in-hyderabad-hospital-due-to-ill-health | सुपरस्टार कमल हसन तब्येतीच्या कारणाने रुग्णालयात दाखल

सुपरस्टार कमल हसन तब्येतीच्या कारणाने रुग्णालयात दाखल

googlenewsNext

सुपरस्टार कमल हसन यांना तब्येतीच्या कारणामुळे काल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.श्री रामचंद्र मेडिकल सेंटर मध्ये ते  उपचार घेत आहेत. रेग्युलर चेकअप साठी त्यांना ते रुग्णालयात दाखल असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांना ताप आणि अस्वस्थता जाणवल्याने ते त्वरित रुग्णालयात गेले.डॉक्टरांनी पुढील काही दिवस त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. 

कमल हसन कालच चेन्नई येथील रुग्णालयात दाखल झाले. तब्येत चांगली असेल तर त्यांना आज डिस्चार्ज मिळण्याचीही शक्यता आहे. सध्या ते तमिळ बिग बॉस सीझन ६ च्या शुटमध्ये व्यग्र होते. व्यस्त शेड्युलमुळे तब्येतीकडे लक्ष देता आले नाही. म्हणून त्यांना अस्वस्थता जाणवत होती. आता त्यांची तब्येत उत्तम असल्याची माहिती कळत आहे. 

कमल हसन यांनी नुकतीच दिग्दर्शक के विश्वनाथ यांची हैदराबाद येथे भेट घेतली होती. त्यानंतर ते चेन्नईला परतले. मात्र अस्वस्थ वाटू लागल्याने ते रुग्णालयात गेले. डॉक्टरांनी त्यांना २ दिवस आराम करण्याचा सल्ला दिला.

Web Title: kamal-hasan-admitted-in-hyderabad-hospital-due-to-ill-health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.