थलायवासोबत 40 वर्षांपासून काम केलं नाही, कमल हसन यांनी सांगितलं कारण; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 11:16 AM2024-07-02T11:16:38+5:302024-07-02T11:16:57+5:30
सुरुवातीला त्यांनी काही सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. पण नंतर ते पुन्हा सोबत दिसलेच नाहीत.
कमल हसन (Kamal Hassan) आणि रजनीकांत (Rajinikanth) हे साऊथचे दिग्गज अभिनेते. दोघांची लोकप्रियता तोडीस तोड आहे. एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे त्यांनी दिले आहेत. थलायवा आणि कमल हसन यांनी एकत्रित काम करुन तब्बल 40 वर्ष झाली आहेत. सुरुवातीला त्यांनी काही सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. पण नंतर ते पुन्हा सोबत दिसलेच नाहीत. नुकतंच कमल हसन यांनी यावर उत्तर दिलं आहे.
कमल हसन यांना रजनीकांतसोबत काम करण्याच्या त्यांच्या इक्वेशनबद्दल विचारण्यात आलं. तसंच भविष्यात दोघं सोबत दिसतील का असाही प्रश्न विचारला. इंडियन एक्सप्रेसशी बातचीत करताना कमल हसन म्हणाले, "हे काही नवीन कॉम्बिनेशन नसणार आहे. आम्ही याआधी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. नंतर मात्र आम्ही सोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. आम्ही काही २ स्पर्धकांसारखे नाही आहोत. आमचे दोघांचे गुरु एकच आहेत ते म्हणजे तमिळ फिल्ममेकर के बालाचंद्र. दुसरीकडे खुली स्पर्धा असते. पण इथे आमच्यात काही वैर नाही फक्त आमचे रस्ते वेगळे आहेत."
ते पुढे म्हणाले, "आम्ही कधीच एकमेकांबद्दल नकारात्मक कमेंट्स केले नाहीत. वयाच्या २० व्या वर्षीच आम्ही हा निर्णय घेतला होता."
कमल हसन लवकरच 'इंडियन 2' मध्ये दिसणार आहे. याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. ''इंडियन 2' हिंदी ट्रेलर लाँचवेळी त्यांनी हिंदी प्रेक्षकांचे आभार मानले. कमल हसन यांनी 1981 साली आलेल्या 'एक दूजे के लिए' सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. ते म्हणाले, "मी तुमचे आभार मानू इच्छितो कारण मला आधी वाटायचं मी तमिळ आहे आणि हीच माझी जागा आहे. पण 35 वर्षांपूर्वी किंवा त्याहीआधीच याची जाणीव करुन दिली की मी इंडियन आहे. मी फक्त साऊथ इंडियन अभिनेता होतो तुम्ही मला इंडियन अभिनेता बनवलं. मी कायम तुमचा ऋणी राहीन."