कंगनाला मारहाण झाल्यानंतर रवीना टंडनची संतप्त पोस्ट, म्हणाली - "महिलांचा अपमान चुकीचं असून.."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 05:19 PM2024-06-07T17:19:47+5:302024-06-07T17:21:29+5:30
कंगना रणौतला एअरपोर्टवर मारहाण झाल्यावर रवीना टंडनने तिची बाजू घेऊन एक पोस्ट लिहिली आहे (kangana ranaut, raveena tondon)
अभिनेत्री कंगना रणौतला चंदीगढ एअरपोर्टवर मारहाण झाली. एका CISF जवान महिलेने कंगनाच्या कानशिलात लगावली. त्यामुळे हे प्रकरण सध्या खूप तापलंय. सामान्य माणसांपासून अनेक सेलिब्रिटी या प्रकरणाचा निषेध करत आहेत. लोक कंगनाला समर्थन देत आहेत. अशातच अभिनेत्री रविना टंडनने याप्रकरणी मौन सोडलं असून तिने कंगनाला पाठिंबा दर्शवला आहे.
कंगनाला मारहाण झाल्यानंतर काय म्हणाली रवीना?
रवीनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करुन लिहिलंय की, "या दुनियेत पदोपदी सार्वजनिक सुरक्षेला सामोरं जावं लागतं. महिला सुद्धा सर्व व्यक्तिंप्रमाणे एक माणूस आहेत, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी महिलांचा अपमान करणे चुकीचे आणि हानिकारक आहे. जगभरातील महिला आणि मुलांवरील वाढत्या हिंसाचाराकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. आता वेळ आली आहे की, आपण हिंसाचार आणि गुंडगिरीविरुद्ध एकजूट होण्याची." अशी पोस्ट करत रविनाने कंगनावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे.
#KanganaRanaut slapped by a CISF constable, Kulwinder Kaur. She was reportedly upset with Kangana's comments on farmers.
— Roop Darak (Modi Ka Parivar) (@RoopDarak) June 6, 2024
Despicable way of expressing ideological differences, especially when you're wearing a uniform! pic.twitter.com/EH4DRqbKJu
रवीनावर लागलेला मारहाण केल्याचा आरोप
काही दिवसांपुर्वी रवीना टंडनचा ड्रायव्हर रिझवी कॉलेजजवळ कार्टर रोडवर रॅश ड्रायव्हिंग करत होता. त्याने तीन जणांना मारहाण केल्याचा आरोप आहे. रवीनाला याबाबत विचारले असता, अभिनेत्री मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला. ती त्या अवस्थेत कार बाहेर आली आणि पीडितांना शिवीगाळ करून त्यांच्याशी भांडू लागली असा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन्ही पक्ष पोलिसांसमोर हजर झाले होते. पण, यानंतर घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. फुटेजमध्ये पाहून मुंबई पोलिसांनी रवीना टंडनच्या विरोधातली तक्रार खोटी असल्याचे सांगितले आहे. या घटनेमध्ये कुणालाही मारहाण झाली नसून शाब्दिक बाचाबाचीमुळे हा वाद वाढल्याचं पोलिसांनी सांगितलं.