Kangana Ranaut वर कोसळला दुःखाचा डोंगर, आजीचं निधन, शेअर केली भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 07:12 PM2024-11-09T19:12:32+5:302024-11-09T19:13:10+5:30
कंगना राणौत(Kangana Ranaut)च्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ८ नोव्हेंबरला रात्री अभिनेत्री कंगना रणौतची आजी इंद्राणी ठाकूर यांचे निधन झाले.
बॉलिवूड अभिनेत्री आणि मंडीतील भाजप खासदार कंगना राणौत(Kangana Ranaut)च्या घरातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. कंगनाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ८ नोव्हेंबरला रात्री अभिनेत्री कंगना रणौतची आजी इंद्राणी ठाकूर यांचे निधन झाले. त्यांचे वय १०० वर्षांपेक्षा जास्त होते. खुद्द अभिनेत्री कंगना रणौतने ही दु:खद बातमी तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केली आहे. आजीच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी तिने तिच्या चाहत्यांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये कंगनाने म्हटले की, तिच्या आजीच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंबात शोककळा पसरली आहे. अभिनेत्रीने सांगितले की, काही दिवसांपूर्वी तिची आजी तिची खोली साफ करत होती. यादरम्यान त्यांना ब्रेन स्ट्रोक आला. यामुळे त्या अनेक दिवस अंथरुणावर होत्या. हा क्षण तिच्यासाठी खूप वेदनादायी होता. कंगनाने सांगितले की, तिची आजी १०० वर्षांची असूनही ती प्रत्येक कामात पूर्ण झोकून देत असे. ती आमच्यासाठी एक प्रेरणा होती.
कंगना राणौतचे तिच्या आजीवर खूप प्रेम आहे. यासोबतच ती आजीसोबतचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करत असते. यासोबतच कंगनाने तिच्या आजीबद्दल आणि मुलांचे संगोपन कसे केले याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
कंगनाची आजीबद्दल भावनिक पोस्ट
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना कंगनाने लिहिले की, माझी आजी सामान्य महिला नव्हती. त्यांना ५ मुले होती. माझ्या आजीकडे खूप मर्यादित संसाधने होती. पण माझ्या आजीने तिच्या मुलांचे चांगले संगोपन केले. आजीने आपल्या सर्व मुलांनी चांगल्या संस्थेत उच्च शिक्षण घ्यावे याची काळजी घेतली. आजीला तिच्या सर्व मुलांचा अभिमान होता.
''आजी आमच्या DNAमध्ये जिवंत राहील...''
कंगनाने असेही सांगितले की तिच्या आजीने नेहमीच महिलांना पुढे जाण्यासाठी प्रेरित केले आहे. आपल्या विवाहित मुलींना त्यांनी आपल्या पायावर उभे राहता यावे यासाठी त्यांनी काम करण्याचा सल्ला नेहमीच दिला. त्यांच्या मुलींनाही सरकारी नोकऱ्या मिळाल्या, ही त्या काळातली दुर्मिळ कामगिरी होती. माझ्या आजीला तिच्या मुलांच्या करिअरचा खूप अभिमान होता. माझी आजी आज नसली तरी ती नेहमी आमच्या डीएनएमध्ये आणि आमच्या उपस्थितीत असेल आणि ती नेहमी लक्षात राहील.