बॉलिवूड अभिनेत्यांवर कंगना राणौतने केले धक्कादायक आरोप, म्हणाली- "मेसेज करून घरी बोलवतात..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 11:30 AM2024-09-17T11:30:15+5:302024-09-17T11:31:04+5:30

Kangana Ranaut : बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत सिनेइंडस्ट्रीत तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते.

Kangana Ranaut made shocking accusations against Bollywood actors, said- "They send messages and invite them home..." | बॉलिवूड अभिनेत्यांवर कंगना राणौतने केले धक्कादायक आरोप, म्हणाली- "मेसेज करून घरी बोलवतात..."

बॉलिवूड अभिनेत्यांवर कंगना राणौतने केले धक्कादायक आरोप, म्हणाली- "मेसेज करून घरी बोलवतात..."

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत (Kangana Ranaut) सिनेइंडस्ट्रीत तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अभिनेत्रीने अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करत असते. अभिनेत्री सध्या तिच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. अलिकडेच एका कार्यक्रमादरम्यान तिने इंडस्ट्रीतील महिलांच्या स्थितीबद्दल सांगितले. कंगना म्हणते की इंडस्ट्रीत महिलांचे शोषण होते.

न्यूज १८ च्या कार्यक्रमात बोलताना कंगना म्हणाली की, 'हे लोक महिलांचे कसे शोषण करतात हे तुम्हाला माहिती आहे का? हे लोक महिलांना मेसेज पाठवून त्यांच्या घरी जेवायला बोलवतात. कोलकाता बलात्कार प्रकरणच बघा. मला अनेकदा बलात्काराच्या धमक्याही आल्या आहेत. आम्हाला माहित आहे की आम्हा महिलांचा आदर करत नाही. चित्रपटसृष्टीही वेगळी नाही. कॉलेजची मुले बायकांवर कमेंट करतात. हिरो देखील असेच असतात, ते वेगळे नसतात. कामाच्या ठिकाणी त्यांचे काय होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे.

सरोज खान यांचे जुन्या स्टेटमेंटला दिला उजाळा  
कंगनाने सरोज खान यांच्या त्या जुन्या विधानाची आठवण करून दिली. ती म्हणाली की, एकदा सरोज खान यांना चित्रपटसृष्टीतील बलात्कार आणि लैंगिक छळाबद्दल विचारण्यात आले होते. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की, ''ते बलात्कार करतात पण त्यांना भाकरीही देतात, हीच अवस्था आहे आमच्या चित्रपटसृष्टीतल्या मुलींची.''

मल्याळम फिल्म इंडस्ट्रीत सध्या सुरू असलेल्या MeToo चळवळीने देश हादरला असताना कंगना राणौतने हे आरोप केले आहेत. हेमा समितीचा अहवाल सार्वजनिक झाल्यानंतरच हे संपूर्ण प्रकरण समोर आले.

Web Title: Kangana Ranaut made shocking accusations against Bollywood actors, said- "They send messages and invite them home..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.