"त्या फिल्म इंडस्ट्रीतील प्रतिष्ठित अभिनेत्री..." जया बच्चन यांच्या विषयी नेमकं काय म्हणाली कंगना ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 03:30 PM2024-09-19T15:30:07+5:302024-09-19T15:38:02+5:30

कंगनाने थेट अभिनेत्री आणि खासदार असलेल्या जया बच्चन यांचं कौतुक केलं आहे. 

Kangana Ranaut praised Jaya Bachchan describes as one of the most dignified women in the film | "त्या फिल्म इंडस्ट्रीतील प्रतिष्ठित अभिनेत्री..." जया बच्चन यांच्या विषयी नेमकं काय म्हणाली कंगना ?

"त्या फिल्म इंडस्ट्रीतील प्रतिष्ठित अभिनेत्री..." जया बच्चन यांच्या विषयी नेमकं काय म्हणाली कंगना ?

Kangana Ranaut on Jaya Bachchan : अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. खासदार होण्याआधीही कंगना तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असायची. आता खासदार झाल्यानंतरही ती आपल्या वक्तव्यामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. अशातच कंगनाने थेट अभिनेत्री आणि खासदार असलेल्या जया बच्चन यांचं कौतुक केलं आहे. 

 जया बच्चन यांचं चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित अभिनेत्री असं वर्णन तिनं केलं आहे. 'न्यूज 18' ला दिलेल्या मुलाखतीत कंगना राणौत म्हणाली, 'जया बच्चन कदाचित रागीट स्वभावामुळे ओळखल्या जात असतील, पण सत्य हे आहे की त्या फिल्म इंडस्ट्रीतील अशा महिलांपैकी एक आहेत, ज्यांनी सक्षमीकरणाचा संदेश दिला आहे.  70 च्या दशकात त्यांनी गुड्डीसारखे चित्रपट केले. अशा चित्रपटातून त्यांनी एक सुंदर संदेश दिला आहे. त्या एक आदरणीय अभिनेत्री आहेत". 


एवढंच नाही कंगनाने जया यांच्या संसदेतील कामकाजाचेही कौतुक केले. कंगना म्हणाली, "जया बच्चन जेव्हा राज्यसभेत स्वतःला सादर करतात, तेव्हा मला ते फार आवडतं. त्या महिला चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधित्व करत आहेत, ही चांगली गोष्ट आहे".  बेधडक आणि स्पष्टवक्ती असलेली कंगना ही अनेक गोष्टींवर आपले मत मांडताना दिसते.  पण, क्वचितच ती कोणाची प्रशंसा करताना दिसली असेल. कंगना सहजा-सहजी  कुणाचं कौतुक करत नाही. पण तिने जया यांचं केलेलं कौतुक पाहून तिचे चाहतेही थक्क झाले आहेत. 


कंगना सध्या त्यांच्या आगामी 'इमर्जन्सी' या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. यामध्ये त्या देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहेत. ‘न्यूज 18 इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत कंगना यांनी भिंद्रनवाले यांना पंजाबच्या इतिहासातील फूट पाडणारी व्यक्ती असं संबोधलं. इतकंच नव्हे तर तिने त्यांना 'दहशतवादी' असंही म्हटलंय. भिंद्रनवाले यांची शीख धर्माच्या प्रचाराची जबाबदारी असलेल्या दमदमी टकसालच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. जून 1984 मध्ये ऑपरेशन ब्लूस्टारदरम्यान त्यांची हत्या करण्यात आली होती.

 

Web Title: Kangana Ranaut praised Jaya Bachchan describes as one of the most dignified women in the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.