कंगना राणौत पोहोचली अयोध्येत, हनुमान गढी मंदिरात मारला झाडू, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 03:46 PM2024-01-21T15:46:22+5:302024-01-21T15:46:38+5:30
देशभरात सध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात सुरु आहे.
ज्या ऐतिहासिक क्षणाची संपूर्ण देश वाट पाहत आहे तो दूर नाही. आयोध्येत उद्या (22 जानेवारी) रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा मोठ्या थाटामाटात होणार आहे. देशभरात सध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात सुरु आहे. रामललाच्या आगमनामुळे अवघा भारत देश राममय झाला आहे. या ऐतिहासिक क्षणासाठी राजकारणी आणि सेलिब्रिटीज अयोध्येत पोहोचू लागले आहेत. अभिनेत्री कंगना रणौतही अयोध्येत पोहचली आहे.
कंगना हनुमान गढीमध्येही पोहोचली, जिथे तिने यज्ञात सहभाग घेतला. यावेळी कंगनाने लाल रंगाची बनारसी साडी परिधान केली होती. देवाचे दर्शन घेतल्यानंतर कंगनाने मंदिरात झाडू मारला. अभिनेत्री म्हणाली, "स्वच्छता मोहिमेद्वारे लोकांना प्रेरित करायचे आहे. अयोध्या फुलांनी सजली आहे आणि लोक भक्तीमध्ये तल्लीन आहेत". तसेच कंगानाने गुरु रामभद्राचार्य यांचीही भेट घेतली. या भेटीचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आओ मेरे राम ।
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 21, 2024
आज परमपूजनीय श्री रामभद्राचार्य जी से भेंट हुई, उनका आशीर्वाद लिया।
उनके द्वारा आयोजित शास्त्रवत् सामूहिक हनुमान जी यज्ञ में भाग लिया।
अयोध्या धाम में श्री राम के स्वागत में सब राममयी हैं। कल अयोध्या के राजा लम्बे वनवास के बाद अपने घर आ रहे हैं ।
आओ मेरे राम, आओ… pic.twitter.com/XKxHHGIgh0
फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, 'आज मी परमपूज्य श्री रामाचार्यभद्र यांची भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेतले. आयोजित केलेल्या शास्त्रवत मास हनुमान यज्ञात सहभागी झाले होते. अयोध्या धाममध्ये श्रीरामाचे स्वागत करताना सर्वांना आनंद होत आहे. उद्या अयोध्येचा राजा वनवास संपवून आपल्या घरी येत आहे'. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत.
#WATCH | Uttar Pradesh: Actress Kangana Ranaut participates in cleanliness drive at Hanuman Garhi Temple in Ayodhya.
— ANI (@ANI) January 21, 2024
She is in Ayodhya to attend the Pran Pratishtha ceremony tomorrow. pic.twitter.com/LpElT3ROdf
गेल्या महिन्यातच कंगना रणौत रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहोचली होती. तेव्हा ती तिच्या 'तेजस' सिनेमाचं प्रमोशन करत होती. यावेळी मंदिराचे काम पूर्ण करणाऱ्या कारागिरांशी तिने संवाद साधला होता. यावेळी, कंगनाने जय श्रीराम अशी घोषणाबाजीही केली होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचा शुभारंभ होणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाला भारतरत्न सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अमिताभ बच्चन, उद्योगपती मुकेश अंबानी, अक्षय कुमार, आशा भोसले यांना आमंत्रित करण्यात आलंय.