"हॅलो फ्रॉम Melodi टीम", जॉर्जिया मेलोनी आणि PM मोदींच्या व्हायरल व्हिडिओवर कंगनाची प्रतिक्रिया, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 04:32 PM2024-06-15T16:32:43+5:302024-06-15T16:33:12+5:30
जी-७ परिषदेतील मोदींबरोबरचा त्यांचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. "हॅलो फ्रॉम दी Melodi टीम" असं म्हणताना दिसत आहेत. मोदींच्या या व्हायरल व्हिडिओवर बॉलिवूड अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत हिने प्रतिक्रिया दिली आहे.
जी-७ परिषदेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटलीला गेले होते. या परिषेदेत मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. यावेळी जॉर्जिया मेलोनी यांनी नरेंद्र मोदींचं सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन केलं. जॉर्जिया मेलोनी यांनी नरेंद्र मोदींसोबत सेल्फीही घेतला. त्याबरोबरच जी-७ परिषदेतील मोदींबरोबरचा त्यांचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओत जॉर्जिया नरेंद्र मोदींबरोबर दिसत आहेत. "हॅलो फ्रॉम दी Melodi टीम" असं म्हणताना दिसत आहेत. तर मोदींच्या चेहऱ्यावर देखील हास्य दिसत आहेत. हा व्हिडिओ जॉर्जिया यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यांनी "हाय फ्रेंड्स फ्रॉम #Melodi", असं कॅप्शन दिलं आहे. मोदी आणि जॉर्जिया यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर हा व्हायरल झाला आहे. मोदींच्या या व्हायरल व्हिडिओवर बॉलिवूड अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत हिने प्रतिक्रिया दिली आहे.
कंगनाने मोदी आणि जॉर्जिया यांचा हा व्हिडिओ तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत ती म्हणते, "मोदींचा सर्वात चांगला गुण म्हणजे ते महिलांना हे जाणवून देतात की ते त्यांच्यासाठी काम करत आहेत आणि महिलांनी प्रगती करावी अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळेच मेलोनी यांना वाटलं असेल की मोदीजी त्यांच्या टीममध्ये आहेत".
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी संयुक्त अरब अमिरातीमध्ये 'वर्ल्ड क्लायमेट अॅक्शन समिट' (COP-28 समिट) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदीही उपस्थित होते. त्यावेळी जॉर्जिया मेलोनी यांनी नरेंद्र मोदींसोबत सेल्फी घेतला होता. यानंतर जॉर्जिया मेलोनी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नरेंद्र मोदींसोबतचा सेल्फी शेअर केला होता. तसेच, हा फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये #Melodi हा हॅशटॅग वापरला होता. त्यावेळी हा सेल्फी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आणि चर्चेचा विषय बनला होता.