Salman Rushdie यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यावर कंगना राणौतची प्रतिक्रिया, म्हणाली- धक्का बसला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 02:16 PM2022-08-13T14:16:12+5:302022-08-13T14:32:44+5:30
Salman Rushdie attacked: सलमान रश्दी यांच्यावर प्राणघातक हल्लाबाबत अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी निषेध व्यक्त केला आहे. अभिनेत्री कंगना राणौतनेही या जीवघेण्या हल्ल्यावर संताप व्यक्त केला आहे.
लेखक सलमान रश्दी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची एक मोठी घटना नुकतीच घडली. मिळालेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कमधील बफेलो जवळील चौटौका येथे व्याख्यानापूर्वी स्टेजवर रश्दी यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. त्या हल्ल्यात ते जखमी झाले. शुक्रवारी सकाळी व्याख्यान देण्यापूर्वी CHQ 2022 कार्यक्रमासाठी स्टेजवर असताना सलमान रश्दी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सलमान रश्दी यांच्यावरील झालेल्या हल्ल्याचा निषेध जगभरातून करण्यात येत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिने या हल्ल्याचा निषेध केला आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक लेख शेअर करताना कंगना राणौतने लिहिले - या जिहादींनी आणखी एक भयानक घटना घडवली आहे. द सॅटॅनिक व्हर्सेस हे त्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट पुस्तकांपैकी एक आहे... माझ्याकडे शब्द नाहीत... धक्का बसला"
स्वरा भास्करनेही केलंय ट्विट
अभिनेत्री स्वरा भास्करनेही या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्याने ट्विट केले- सलमान रश्दी यांच्यावरील हल्ला लज्जास्पद, निषेधार्ह आणि भ्याड हल्ला!
Thoughts and prayers for #SalmanRushdie
— Swara Bhasker (@ReallySwara) August 12, 2022
Shameful, condemnable and dastardly this attack! #SalmanRushdieStabbed
कंगना आणि स्वरा व्यतिरिक्त गीतकार जावेद अख्तर यांनीही ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिलं - 'काही कट्टरवाद्यांनी सलमान रश्दी यांच्यावर केलेल्या या हल्ल्याचा निषेध करतो. मला आशा आहे की न्यूयॉर्क पोलीस आणि न्यायालय हल्लेखोराविरुद्ध शक्य तितकी कठोर कारवाई करतील.
I condemn the barbaric attack on Salman Rushdie by some fanatic . I hope that NY police and the court will take the strongest action possible against the attacker .
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) August 12, 2022
सलमान रश्दी यांच्या 'द सॅटॅनिक व्हर्सेस' या पुस्तकावर १९८८ पासून इराणमध्ये बंदी घालण्यात आली आहेत. या पुस्तकातील विचार मुस्लीमविरोधी असल्याचे काही मुस्लीम मूलतत्ववादींचे म्हणणे आहे. त्यामुळे गेल्या १५ वर्षांपासून त्यांना विविध प्रकारच्या धमक्या मिळत होत्या. आज न्यूयॉर्कमध्ये भर कार्यक्रमात त्यांच्यावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला.