घोर कलियुग! रणबीर कपूर तर नशेबाज, तरी तो श्रीरामाच्या भूमिकेत कसा? कंगना रणौत भडकली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 10:18 AM2023-06-11T10:18:56+5:302023-06-11T10:20:26+5:30

साऊथच्या सरळ साध्या हिरोला रावण बनवलंत आणि या पांढऱ्या रणबीरला श्रीराम असं म्हणत कंगना रणौतने संताप व्यक्त केला आहे.

kangana ranaut reacts to the news of ranbir kapoor to play shriram in ramayan movie | घोर कलियुग! रणबीर कपूर तर नशेबाज, तरी तो श्रीरामाच्या भूमिकेत कसा? कंगना रणौत भडकली

घोर कलियुग! रणबीर कपूर तर नशेबाज, तरी तो श्रीरामाच्या भूमिकेत कसा? कंगना रणौत भडकली

googlenewsNext

अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) नेहमी काही ना काही वक्तव्य करत चर्चेत राहते. बॉलिवूड आणि कलाकार तर सतत तिच्या निशाण्यावर असतात. अगदी बिग बींपासून ते नवोदित कलाकार सगळ्यांवरच तिने टीका केली आहे. आता नुकतंच तिने अभिनेता रणबीर कपूरला धारेवर धरलं आहे. नितेश तिवारींच्या 'रामायण' साठी अभिनेता रणबीर कपूरला (Ranbir Kapoor)  श्रीरामाच्या भूमिकेत घेण्यावरुन तिने टीका केली आहे.  तिला हे अजिबातच रुचलं नाहीए. यावरुन तिने केलेली पोस्ट व्हायरल होत आहे.

कंगनाने एक लांबलचक पोस्ट करत लिहिले, "नुकतेच मी रामायणावर आधारित आणखी एक बॉलिवूड फिल्म येतेय असे ऐकले.  यामध्ये एक स्किनी पांढरा उंदिर(कथित अभिनेता) जो इंडस्ट्रीत प्रत्येकाविरोधात वाईट पीआर करण्यासाठी प्रसिद्ध आहे, शिव ट्रायॉलॉजीमध्ये भगवान शिवची भूमिका साकारण्याचा त्याने प्रयत्न केला ज्याचे पुढचे पार्ट्स पाहण्याची कोणाचीच इच्छा नाही. जो मुलींना फिरवणारा आणि ड्रग अॅडिक्ट म्हणून प्रसिद्ध आहे. आता तो श्रीरामाची भूमिका साकारण्यासाठी उत्सुक आहे. तर दुसरीकडे साऊथचा एक युवा सुपरस्टार ज्याने स्वत:ला सिद्ध केले आहे , वाल्मिकींच्यानुसार तो रंगाने, व्यवहाराने आणि चेहऱ्याने श्रीरामारखा दिसतो...त्याला रावणाची भूमिका मिळते. 

तिने पुढे लिहिले, "घोर कलियुग आहे. एक मलूल दिसणारा, नशा करणारा अभिनेता श्रीरामाच्या भूमिकेत अजिबातच नको. जय श्रीराम." नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमात साऊथ सुपरस्टार 'केजीएफ' फेम अभिनेता यशला (Yash) रावणाची भूमिका ऑफर झाल्याची चर्चा आहे. या कारणाने कंगना चांगलीच भडकली आहे. हा कसा कलियुग आहे म्हणत तिने जोरदार टीका केली आहे.

कंगना रणौत लवकरच 'इमर्जन्सी' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत आहे. यापूर्वी तिचा 'धाकड' सिनेमा रिलीज झाला होता जो फारशी कमाल दाखवू शकला नाही. आता 'इमर्जन्सी'कडून कंगनाला अपेक्षा आहेत.

Web Title: kangana ranaut reacts to the news of ranbir kapoor to play shriram in ramayan movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.