पंतप्रधान मोदींच्या भाषणातून कॉपी केला 'तेजस'मधला डायलॉग? वाचा काय म्हणाली कंगना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 01:14 PM2023-10-09T13:14:12+5:302023-10-09T13:18:22+5:30

'तेजस' चित्रपटातील 'भारत को छेड़ोगे तो छोड़ेंगे नहीं' या डायलॉगने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं.

Kangana Ranaut reacts to Twitter user asking her to give credit to PM Narendra Modi for her viral dialogue in ‘Tejas’ | पंतप्रधान मोदींच्या भाषणातून कॉपी केला 'तेजस'मधला डायलॉग? वाचा काय म्हणाली कंगना

Kangana Ranaut

googlenewsNext

बॉलिवूड क्विन कंगना राणौत 'तेजस' चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत आहे. ट्रेलरमधील 'भारत को छेड़ोगे तो छोड़ेंगे नहीं' या डायलॉगने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं. कारण हा डायलॉग आणि मोदींच्या एका भाषणातील वक्तव्यात साम्य आहे. त्यामुळे एका नेटकऱ्याने  या चर्चित डायलॉगचं श्रेय मोदींना देणार का? असे प्रश्न कंगनाला केला आहे. यावर कंगनानेही आपल्या अंदाजात उत्तर दिलं.  

एका ट्विटर युजरने नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये मोदी बोलताना दिसत आहेत की, "जर कोणी भारताला छेडले तर भारत त्याला सोडत नाही". हा व्हिडिओ शेअर करताना यूजरने कंगना रणौतला टॅग केलं. तेजसच्या या डायलॉगचे श्रेय पीएम मोदींना मिळायला हवे, असे त्याने म्हटले. यावर अभिनेत्रीनेही ' हो नक्कीच श्रेय  निश्चितपणे त्यांनाच जाते', अशी प्रतिक्रिया दिली. 

तेजसमध्ये कंगना रणौत तेजस गिल या महिला पायलटची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर ८ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. दमदार असा ट्रेलर पाहिल्यानंतर आता चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.  'तेजस' हा चित्रपट २७ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

तेजसमध्ये कंगना वायुसेना वैमानिक तेजस गिलची भूमिका साकारत आहे. RSVP निर्मित 'तेजस'मध्ये देशाचे रक्षण करण्यासाठी कसे हवाई दलाचे वैमानिक आपल्या जीवाची बाजी लावतात, हे या दाखवले आहे.  या चित्रपटातील महिला पायलट तेजस गिलच्या तयारीसाठी कंगनाने ४ महिने प्रशिक्षण घेतले होते. भारतीय सैन्यात वापरल्या जाणार्‍या सर्व लढाऊ तंत्र तिने शिकून घेतले.

Web Title: Kangana Ranaut reacts to Twitter user asking her to give credit to PM Narendra Modi for her viral dialogue in ‘Tejas’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.