खास आमंत्रण असूनही अनंत-राधिकाच्या लग्नाला गेली नव्हती कंगना राणौत, अखेर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 12:34 PM2024-08-25T12:34:02+5:302024-08-25T12:35:04+5:30

कंगना सध्या तिच्या 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती विविध ठिकाणी मुलाखती देत आहे.

Kangana Ranaut reveals the REASON for skipping Anant Ambani and Radhika wedding despite personal invitation | खास आमंत्रण असूनही अनंत-राधिकाच्या लग्नाला गेली नव्हती कंगना राणौत, अखेर केला खुलासा

खास आमंत्रण असूनही अनंत-राधिकाच्या लग्नाला गेली नव्हती कंगना राणौत, अखेर केला खुलासा

Kangana Ranaut on Anant-Radhika Wedding : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा (Anant Ambani and Radhika Merchant Wedding) १२ जुलैला थाटामाटात पार पडला. या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी देश-विदेशातील पाहुणे मुंबईत आले होते. याशिवाय या सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांची तर मांदियाळी जमल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, या लग्नात बॉलिवूड क्वीन कंगना राणौत (Kangana Ranaut) सहभागी झाली नव्हती. विशेष म्हणजे कंगनाला अनंत अंबानींने खास फोन करुन लग्नाचं आमंत्रण दिलं होतं. पण, तरीही कंगना अनंत-राधिकाच्या लग्नाला गेली नव्हती. नुकतंच एका मुलाखतीमध्ये कंगना हिने लग्नाला न जाण्यामागचे कारण सांगितले. 

कंगना सध्या तिच्या 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती विविध ठिकाणी मुलाखती देत आहे. नुकतंच कंगनाने सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली. यावेळी तिने वैयक्तिकरित्या आमंत्रण असुनही अनंत अंबानींच्या शाही लग्नाला का उपस्थित राहिली नाही, याबद्दलचा खुलासा केला. कंगनाच्या घरी तिच्या धाकट्या भावाचे लग्न होते, त्यामुळे कंगना ही अनंत-राधिकाच्या लग्नाला गेली नव्हती, असे तिने सांगितले. 


सिद्धार्थ कन्ननशी बोलताना कंगना म्हणाली, "मला अनंत अंबानींचा फोन आला होता. तो खूपच गोड मुलगा आहे. तू माझ्या लग्नाला यायलाच हवं, असं तो म्हणाला. पण, मी त्याला म्हटलं, हे बघ माझ्या घरीही लग्न आहे. ती एक शुभ तारीख होती, त्यामुळे माझ्या धाकट्या भावाचेही लग्न होते. पण, मी कायमचं अशा फिल्मी लग्नांना जाणे टाळते. त्याला माझ्या खूप शुभेच्छा आहेत". 

यापुर्वी कंगना राणौतने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न समारंभात डान्स करणाऱ्या सेलिब्रिटींवर टीका केली होती. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक लिहलं होतं, "कितीही पैशांची ऑफर आली तरी ती कधीही कोणाच्या लग्नात डान्स करणार नाही". कंगनाने स्वत:ची तुलना गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याशीही केली होती. ज्यांनी सेलिब्रिटींच्या विवाहसोहळ्यात कधीही गाणे गायलं नाही.
 

Web Title: Kangana Ranaut reveals the REASON for skipping Anant Ambani and Radhika wedding despite personal invitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.