तापसी-स्वराला बी ग्रेड अभिनेत्री म्हणाली रंगोली, म्हणे - कंगनाने रोखलं नाही तर.....
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 10:56 AM2020-11-29T10:56:11+5:302020-11-29T10:57:04+5:30
रंगोली चंदेलने नुकतीच सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहिली असून यात तिने दोन अभिनेत्रींवर निशाणा साधला आहे.
अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई हायकोर्टात मोठा विजय मिळाला आहे. पण जो एकमेकांवर आरोपा-प्रत्यारोपाचा आरोप किंवा वाद सुरू झाला होता तो काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. कधी कंगना नेहमीप्रमाणे अनेकांवर शाब्दिक हल्ला चढवत आहे तर कधी तिची बहीण रंगोली चंदेल हे काम करत आहे. रंगोली चंदेलने नुकतीच सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहिली असून यात तिने दोन अभिनेत्रींवर निशाणा साधला आहे.
तापसी-स्वराला म्हणाली बी ग्रेड अभिनेत्री
रंगोली चंदेलनुसार, ज्यावेळी कंगना रनौतचं मुंबईतील ऑफिसची तोडफोड करण्यात आली तेव्हा तापसी पन्नू आणि स्वरा भास्करने याची खिल्ली उडवली होती. आता जेव्हा कंगना केस जिंकली तर कंगनाची बहिणीने सोशल मीडियावर या दोघींवर निशाणा साधला आहे.
रंगोलीने तापसी आणि स्वराला बी ग्रेड अभिनेत्री असल्याचं म्हटलं आहे. पोस्टमध्ये रंगोलीने लिहिले की, जेव्हा आमचा परिवार कठिण काळात होता, आम्ही पूर्णपणे तुटलो होतो, तेव्हा स्वरा आणि तापसीसारख्या बी ग्रेड अभिनेत्री तुटत्या ऑफिसवर हसत होत्या. त्यांनी तर ही कारवाई योग्य असल्याचं म्हटलं होतं. यासाठी तर मी त्यांना कोर्टात खेचू शकते. पण कंगनाने मला थांबवलं. हे लोक कंगनाबाबत जे काही बोलतात त्यावर काही विश्वास ठेवू नका'.
रंगोली चंदेलची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. हैराण करणारी बाब ही आहे की, रंगोलीआधी स्वत: कंगनानेही स्वरा आणि तापसीला बी ग्रेड अभिनेत्री असल्याचं म्हटलं होतं. केवळ फक्त इतका होता की, तेव्हा तिने नेपोटिज्मच्या वादावर रिअॅक्ट होताना निशाणा साधला होता. त्यावेळी कंगना म्हणाली होती की, स्वरा आणि तापसी नेपोटिज्मबाबत काहीच बोलत नाहीत. त्यांना करण जोहरकडून काहीच अडचण नाही.
दरम्यान, ज्या केसवरून रंगोलीने तापसी आणि स्वरावर हल्ला केला त्या केसमध्ये कंगनाला मोठा विजय मिळालाय. मुंबई हायकोर्टने बीएमसीची कारवाई अवैध असल्याचा निर्वाळा दिला आणि अभिनेत्रीच्या झालेल्या नुकसानाची भरपाईची देण्याचा आदेश दिला. यासाठी बीएमसीला मार्च पर्यंतचा वेळ देण्यात आला. या निर्णयानंतर कंगना आणि तिची बहीण रंगोली सोशल मीडियावर अधिक जास्त सक्रिय झाल्या आहेत.