खुलासा! कंगना रणौतचं एका 'नेत्या'सोबत सुरू आहे अफेअर, लग्न आणि बाळाच्या प्लॅनिंगबाबतही बोलली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 04:55 PM2021-11-11T16:55:24+5:302021-11-11T16:58:02+5:30

Kangana Ranaut : का नव्या मुलाखतीतून तिने खुलासा कला की, ती फार आनंदी आहे. लवकरच ती तिच्या पार्टनरबाबत खुलाा करेल आणि आपल्या रिलेशनशिपबाबत इतरही माहिती देईल.

Kangana Ranaut talks about her relationship status, Actress want to get married in five years | खुलासा! कंगना रणौतचं एका 'नेत्या'सोबत सुरू आहे अफेअर, लग्न आणि बाळाच्या प्लॅनिंगबाबतही बोलली

खुलासा! कंगना रणौतचं एका 'नेत्या'सोबत सुरू आहे अफेअर, लग्न आणि बाळाच्या प्लॅनिंगबाबतही बोलली

googlenewsNext

कंगना रणौतला (Kangana Ranaut ) नुकतंच पद्मश्री पुरस्काराने (Padma Award) सन्मानित करण्यात आलं. अवॉर्ड मिळाल्यानंतर तिने तिचा आनंद व्यक्त केला. त्यासोबतच आपल्या फॅमिली प्लॅनिंगबाबतही तिने खुलासा केला. ती म्हणाली की, पुढील पाच वर्षात तिला लग्न करायचं आहे आणि तिला आई व्हायची इच्छा आहे. एका नव्या मुलाखतीतून तिने खुलासा कला की, ती फार आनंदी आहे. लवकरच ती तिच्या पार्टनरबाबत खुलासा करेल आणि आपल्या रिलेशनशिपबाबत इतरही माहिती देईल.

कोण आहे तो?

कंगना रणौतने टाइम्स नाउला दिलेल्या मुलाखती दरम्यान एका प्रश्नाचं उत्तर दिलं की, ती तिला पुढील पाच वर्षात स्वत:ला कुठे बघते. ती म्हणाली की, 'मला निश्चितपणे लग्न करायचं आहे आणि बाळांना जन्म द्यायचा आहे. मी स्वत:ला पाच वर्षानंतर एका आई रूपात आणि एका पत्नीच्या रूपात बघते'. तिने या मुलाखतीत तिच्या पार्टनरबाबतही हिंट दिली आहे. ती म्हणाली की, ती एका अशा व्यक्तीसोबत लग्न करणार आहे, जो नव्या भारताच्या व्हिजनवर सक्रियपणे काम करत आहे.

रिलेशनशिपमध्ये आहे आनंदी

कंगनाला विचारण्यात आलं की, काय तू पुढील पाच वर्षात आई आणि पत्नी बनण्याच्या प्रोजेक्टवर काम करत आहे? यावर कंगनाने हसत उत्तर दिलं की, 'हो'. नंतर कंगनाला तिच्या पार्टनरबाबत विचारण्यात आलं आणि तिने सांगितलं की, 'तुम्हाला लवकरच कळेल'. मग तिला विचारलं की, ती या रिलेशनशिपमध्ये आनंदी आहे का? यावर ती म्हणाली की, 'हो आहे'.

कंगनाने पद्मश्री पुरस्कार मिळाल्यावर इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला  आहे. ज्यात तिने पुरस्कारासाठी आनंद व्यक्त केला. ती म्हणाली की, 'मित्रांनो एका कलाकार नात्याने मला खूप प्रेम मिळालं, सन्मान मिळाला. पण आज पहिल्यांदा मला जीवनात एक आदर्श नागरिक असण्याचा पुरस्कार मिळाला. पद्मश्री, या देशाची, या सरकारची मी आभारी आहे. 

कंगना पुढे म्हणाली की, 'करिअर सुरू केल्यावर ८-१० वर्षांनी मला यश मिळालं तर मजा न करता, मी काही गोष्टींवर काम सुरू केलं. मी फेअरनेस प्रॉडक्ट्सना नकार दिला. फेअरनेस प्रॉडक्ट्सचा बहिष्कार केला. आयटम नंबरचा बहिष्कार केला. मोठमोठ्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करणं बंद केलं. अनेक वैरी बनवले. पैशांपेक्षा जास्त वैरी बनवले'.
 

Web Title: Kangana Ranaut talks about her relationship status, Actress want to get married in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.