Kangana Ranaut : ‘आठवतं ना, घरात घुसून मारलं होतं...’, कंगना राणौतने पुन्हा एकदा करण जोहरला डिवचलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 01:48 PM2022-07-07T13:48:36+5:302022-07-07T13:55:16+5:30
Kangana Ranaut , Karan Johar, Koffee With Karan Season 7 : करण जोहरला डिवचण्याची एकही संधी कंगना सोडत नाही. अशात करण ‘कॉफी विद करण’चा ७ वा सीझन घेऊन येतोय म्हटल्यावर कंगना गप्प कशी बसणार?
कंगना राणौत (Kangana Ranaut) आणि करण जोहर (Karan Johar) यांचं जुनं वैर सगळ्यांनाच ठाऊक आहे. खरं तर आधी कंगना व करण यांच्यात सगळं काही सुरळीत होतं. पण कंगनाने ‘कॉफी विद करण’मध्ये हजेरी लावली आणि या शोनंतर सगळं बिघडलं. होय, कंगनाने करणच्याच शोमध्ये जाऊन त्यालाच ‘मुव्ही माफिया’ म्हटलं होतं. तू नेपोटिज्मला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला होतं. तेव्हापासून कंगना व करण यांच्यात ३६ चा आकडा आहे. करणला डिवचण्याची एकही संधी कंगना सोडत नाही. अशात करण ‘कॉफी विद करण’चा ७ वा सीझन घेऊन येतोय म्हटल्यावर कंगना गप्प कशी बसणार?
आज पासून करणचा ‘कॉफी विद करण 7’ (Koffee With Karan Season 7) हा शो सुरू होतोय आणि यानिमित्ताने कंगनाने पुन्हा एकदा करणला डिवचलं आहे. ‘घर में घुस कर मारा था न...,’ असं तिने म्हटलं आहे.
कंगनाने एक इन्टास्टोरी शेअर केली आहे. ‘पापा जो (करण जोहर) आपल्या सर्व लोकप्रिय कॉफी एपिसोडला प्रमोट करतोय. कारण आज हा शो ओटीटीवर येत आहे. पापा जो गुड लक ... पण माझ्या एपिसोडचं काय? ओह सॉरी... सर्जिकल स्ट्राइक, घरात घुसून मारलं होतं ना... माझा एपिसोड त्याचा सर्वाधिक लोकप्रिय एपिसोड होता आणि यानंतर तो टीव्हीवर बॅन झाला होता...,’ असं तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
कंगना कधीकाळी करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’मध्ये गेस्ट म्हणून गेली होती. या शोमध्ये तिने करणला त्यांच्या तोंडावर ‘मुव्ही माफिया’ म्हटलं होतं. कंगनाचा हा वार करणच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यावेळी करण काही बोलला नव्हता. पण लंडनमधल्या एका इव्हेंटमध्ये त्याने कंगनाला जशात तसं उत्तर दिलं होतं. ‘ मी महिला आहे, या कंगनाच्या वाक्यानं आणि तिच्या व्हिक्टिम कार्डने मी वैतागलो आहे. जेव्हा केव्हा संधी मिळेल, तेव्हा तुम्ही स्वत:ला एखाद्या पीडित व्यक्तीसारखं सादर करू शकत नाही.जणू काही बॉलिवूडमध्ये तुमच्यावर प्रचंड अत्याचार होत आहेत. बॉलिवूड इतकं वाईट असेल तर सोडून द्यावं,’ असं म्हणत करणने कंगनाचा वचपा काढला होता.