कंगना राणौत लवकरच लग्न करणार? होणाऱ्या जावयाबद्दल अभिनेत्रीच्या आईनेच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 04:40 PM2024-04-04T16:40:14+5:302024-04-05T10:18:16+5:30
कंगनाच्या लग्नाबद्दल तिच्या आईला नक्की काय वाटतं?
सध्या सगळीकडे लोकसभा निवडणूकीचे वारे वाहत आहे. बॉलिवूडमध्येही निवडणूकांची चर्चा आहे. बॉलिवूडची 'क्वीन' कंगना रणौत (Kangana Ranaut) स्वत: हिमाचल प्रदेशच्या मंडी येथून निवडणूक लढवणार आहे. सध्या कंगना जोरदार प्रचार करत आहे. मंडी ही तिचीच जन्मभूमी असल्याने ती तिथे लोकांमध्ये जात आहे, त्यांचं म्हणणं ऐकून घेत आहे. नुकतंच कंगनाच्या आईने एका मुलाखतीत लेकीच्या लग्नाविषयीचा खुलासा केला. तसंच कंगनाचा जीवनसाथी नक्की कोण आहे यावरही त्या बोलल्या आहेत.
'आज तक' ला दिलेल्या मुलाखतीत कंगना रणौतची आई म्हणाली, "मी तिच्या लग्नासाठी काही गोष्टी ठरवल्या आहेत. तिच्या प्रोफेशननुसारच मुलगा शोधणार आहे. तसंच लवकरात लवकर तिचं लग्न करुन देणार आहे.' कंगनाने स्वत:ही खुलासा करत सांगितले की मला सुद्धा लवकरात लवकर संसार सुरु करायचा आहे. मात्र सध्या मी आता राजकारणात आली असल्याने यावरच लक्ष केंद्रित करत आहे.
मुलगा कसा असेल यावर कंगना म्हणाली, "मुलगा फिल्मइंडस्ट्रीतून नक्कीच नसेल. कारण त्यांची फॅमिली लाईफस्टाईल खूपच वेगळी असते." या मुलाखतीत कंगनाने इतरही अनेक गोष्टींचा खुलासा केला.
कंगना वयाच्या १८ व्या वर्षीच घरातून पळून मुंबईत आली होती. तिला अभिनयात काम करायचं होतं. 2006 साली तिला 'गँगस्टर' हा सिनेमा मिळाला आणि तिच्या करिअरला सुरुवात झाली. मात्र वैयक्तिक आयुष्यात तिने अनेक संकटांचा सामना केला. इंडस्ट्रीतूनही तिला खूप ट्रोल केलं गेलं. आज ती स्वत:च्या मेहनतीने इथपर्यंत पोहोचली आहे.