कंगना रणौतचा अजित डोवाल यांच्यासोबत विमानप्रवास; भेटीने भारावली 'क्वीन'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 04:22 PM2023-10-24T16:22:10+5:302023-10-24T16:42:10+5:30
दसऱ्याच्या दिवशी राजधानी दिल्लीत यंदाचे रावण दहन थोडे वेगळे आणि खास असणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असते. तसेच, आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुनही ती बिनधास्तपणे आपलं मत मांडत असते. आता, तिचा आगामी ‘तेजस’ हा चित्रपट २७ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. याशिवाय 'एमर्जन्सी' सिनेमा २४ नोव्हेंबरला रिलीज होणार होता. त्यासाठी, तिचे दौरे सुरू असून तेजस चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही कंगनाने आज एक विशेष दौरा केला. या दौऱ्यातील विमानप्रवासाचे फोटो कंगनाने ट्विटरवरुन शेअर केले आहेत. या फोटोतून तिच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येते.
दसऱ्याच्या दिवशी राजधानी दिल्लीत यंदाचे रावण दहन थोडे वेगळे आणि खास असणार आहे. कारण, यावेळी रावण दहनाचा बाण अभिनेत्री कंगना राणौतच्या हाती असणार आहे. खुद्द लव कुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन सिंह यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे, कंगनासाठी आजचा दसरा विशेष आहे. तत्पूर्वी तेजस चित्रपटाच्या निमित्ताने प्रमोशनसाठी आज आलेल्या अनुभवातून कंगनाने स्वत:ला नशिबवान असल्याचं म्हटलंय. कारण, तेजस चित्रपटाच्या प्रमोशनानिमित्ताने आज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या भेटीचा योग जुळून आल्याचं कंगनाने म्हटले.
What a generous stroke of luck, aaj subah flight mein I got to sit next to non other than the greatest of all time Shri Ajit Doval ji, while promoting Tejas (a film dedicated to our soldiers) I got to meet sir who is every soldier’s inspiration I consider this a great omen, Jai… pic.twitter.com/VnqbMJLFne
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 24, 2023
नशिबवान... आज सकाळी विमानप्रवासात देशाचे महान श्री अजित डोवालही यांच्याशेजारी बसायला मिळालं. तेजस चित्रपटाच्या प्रमोशनाच्या निमित्ताने हा दौरा होता. हा चित्रपट भारतीय जवानांना समर्पित करण्यात आला आहे. डोवाल सर आपल्या देशातील प्रत्येक सैनिकाचं प्रेरणास्थान आहेत. सरांच्या भेटीचा हा योग म्हणजे मी शुभ शकून मानते, असेही कंगनाने म्हटले आहे. कंगणाने ट्विटरवरुन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासमवतचे फोटो शेअर केले आहेत.
दरम्यान, तेजस चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कंगना एका शुर आणि शक्तिशाली वायुसेनेची पायलट तेजस गिलची भुमिका साकारत आहे. या चित्रपटातील "भारत को छेडोगे तो छोड़ेंगे नहीं" अशाप्रकारचे अप्रतिम संवाद सर्वांना आकर्षित करतात. जबरदस्त साउंडट्रॅक आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससह हा धमाकेदार ट्रेलर रिलिज झाला आहे. हा एक विजुअल स्पेक्टिकल चित्रपट ठरणार आहे. चित्रपटातील जबरदस्त संवाद देशभक्तीची भावना जागृत करतो. वीर वायुसेनेच्या पायलटच्या कंगना मोठ्या पडद्यावर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
दिल्लीत रावण दहन करणार
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत मंगळवारी, २४ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर दिल्लीतील प्रसिद्ध 'लव कुश रामलीला'मध्ये रावण दहन करणार आहे. 'लव कुश रामलीला' समितीचे अध्यक्ष अर्जुन सिंह यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, लाल किल्ल्यावर दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाच्या ५० वर्षांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा एखादी महिला बाण मारून रावणाच्या पुतळ्याचे दहन करेल. महिला आरक्षण विधेयकाला संसदेने मंजुरी दिल्याने समितीने हा निर्णय घेतल्याचे अध्यक्षांनी सांगितले.