कंगना राणौतचा Lock Uppमध्ये लैंगिक शोषणाबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाली- 'एक मुलगा...'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 11:28 AM2022-04-25T11:28:18+5:302022-04-25T11:28:45+5:30

Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने लैंगिक शोषणाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

Kangana Ranaut's shocking revelation about sexual abuse in Lock Upp, said- 'A boy ...' | कंगना राणौतचा Lock Uppमध्ये लैंगिक शोषणाबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाली- 'एक मुलगा...'

कंगना राणौतचा Lock Uppमध्ये लैंगिक शोषणाबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाली- 'एक मुलगा...'

googlenewsNext

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत (Kangana Ranaut) सध्या एकता कपूरच्या 'लॉक अप' (Lock Upp) या रिएलिटी शोमध्ये होस्ट म्हणून दिसत आहे. हा शो सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतो. शोमध्ये स्पर्धक अनेकदा स्वत:शी संबंधित धक्कादायक खुलासे करताना दिसतात. पण, यावेळी शोची होस्ट कंगना राणौत हिने स्वतःबद्दलचा धक्कादायक खुलासा केला आहे, ज्याबद्दल ती सांगताना खूप भावूक झाली होती. 

कंगना राणौतने सांगितले की, ती बालपणी लैंगिक शोषणाची शिकार झाली आहे. शोच्या प्रसारीत झालेल्या भागात, स्पर्धक मुनव्वर फारुकीने त्याच्या बालपणीच्या आघाताबद्दल सांगितले. त्याच्या गुपिताबद्दल बोलताना त्याने सांगितले की, आजपर्यंत त्याने हे गुपित कोणाशीही शेअर केले नव्हते. तो फक्त ६ वर्षांचा असताना त्याच्यासोबत काही चुकीच्या गोष्टी घडल्या. ४-५ वर्षे त्याला काहीच समजले नाही. पण, एका क्षणी गोष्टी खूप वाढल्या. असे सांगत मुनव्वर रडू लागला. हे ऐकून इतर स्पर्धकांसोबत कंगना रणौतही भावूक झाली. त्यानंतर तिने तिच्या बालपणाबद्दल सांगितले 


कंगना म्हणाली की, दरवर्षी अनेक मुलांना यातून जावे लागते. परंतु, लोक सार्वजनिक मंचावर याबद्दल बोलण्यास टाळाटाळ करतात. अनेक मुलांना लहान वयातच नको असलेल्या स्पर्शाला सामोरे जावे लागते. या घटनेचा संदर्भ देत ती म्हणाली की, बालपणी ती लैंगिक शोषणाची शिकार झाली होती. आमच्या गावातील माझ्यापेक्षा वयाने २-३ वर्षांनी मोठा असलेला मुलगा मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असे. पण त्यावेळी हे सर्व समजण्याचे माझे वय नव्हते. त्यामुळे माझ्यासोबत काय घडते आहे किंवा जे घडते आहे ते चुकीचे आहे हे मला कळत नव्हते. लहान वयात असे करणाऱ्या मुलांना शिक्षा दिली जात नाही कारण वयाने लहान असल्याने कोणत्याही गोष्टीची समज नसते. पण या घटना ज्या मुलांसोबत घडतात त्यांच्या मनात मात्र अशा गोष्टींनी आयुष्यभरासाठी एक विशिष्ट प्रकारची भीती निर्माण होते.

Web Title: Kangana Ranaut's shocking revelation about sexual abuse in Lock Upp, said- 'A boy ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.