The Kapil Sharma Show : त्या वर्षभरात कपिल शर्मासोबत काय काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 11:26 AM2019-02-21T11:26:39+5:302019-02-21T11:52:22+5:30
कॉमेडी किंग कपिल शर्माने गत डिसेंबरमध्ये ‘द कपिल शर्मा शो’द्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. तत्पूर्वी वर्षभरात कपिलच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली. तो अनेक वादांत सापडला. डिप्रेशन, मद्याचे व्यसन आदींमध्ये गुरफटला. यामुळे त्याचा शो बंद पडला.
कॉमेडी किंग कपिल शर्माने गत डिसेंबरमध्ये ‘द कपिल शर्मा शो’द्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. तत्पूर्वी वर्षभरात कपिलच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली. तो अनेक वादांत सापडला. डिप्रेशन, मद्याचे व्यसन आदींमध्ये गुरफटला. यामुळे त्याचा शो बंद पडला. आता कपिल शर्माचे करिअर संपले असेच यानंतर सगळ्यांना वाटले. पण कपिलला वेळीच जाग आली आणि तो या सगळ्या दुष्टचक्रातून बाहेर पडला. अलीकडे चंदीगड येथील ड्रग्जविरोधी अभियानात कपिल सहभागी झाला. यावेळी त्या वर्षभरात त्याच्यासोबत काय काय घडले, हे कपिलने सांगितले. हे सांगताना तो अनेकदा भावूक झाला. या कार्यक्रमात संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, रॅपर बादशाह हेही सामील झाले होते.
Thank u Chandigarh for the overwhelming support for #DrugFreeIndia don’t stop until its finished 💪 @ArtofLiving@SriSri@Its_Badshah@duttsanjay@MahaveerJainMum#Nakarunganakarnedunga 🤝😇 pic.twitter.com/NS4j6vKx86
— KAPIL (@KapilSharmaK9) February 20, 2019
तो वर्षभराचा काळ माझ्यासाठी एका दु:खद स्वप्नासारखा राहिला. वाद, बदनामी, डिप्रेशन यामुळे मी मद्याच्या आहारी गेलो. मी चुकीचे करतोय, हे मला कळत होतं. पण या व्यसनाने मला घट्ट विळखा घातला होता. मी दिवसरात्र नशेत असलेला पाहून माझी आई कमालीची चिंतीत होती. एका क्षणाला ती आतून पूर्णपणे तुटली. त्यादिवशी तिला तसे पाहिले आणि यापुढे दारूला हात न लावण्याचा निर्णय मी घेतला. माझ्या आईमुळेच आज मी इथे आहे, असे कपिलने सांगितले. हे सांगताना त्याला अश्रू अनावर झालेत.
Tomorrow 11 am. Chandigarh university. Mohali,Punjab. @SriSri@duttsanjay@Its_Badshah@MahaveerJainMum see u there 🙏 #DrugFreeIndia#NaKarungaNaKarneDoongapic.twitter.com/S5wEIewyFH
— KAPIL (@KapilSharmaK9) February 17, 2019
त्या वर्षभरात कपिल बेंगळुरातील एका आश्रमात राहिला. पण उपचार अर्धवट सोडून तो परतला आणि पुन्हा मद्यपान करू लागला. यानंतर तो पुन्हा याच आश्रमात गेला आणि उपचार पूर्ण करून गत सप्टेंबर महिन्यात परतला. या उपचारादरम्यान कपिल डिप्रेशनमधून बाहेर आला. त्याचे मद्याचे व्यसनही सुटले आणि प्रेक्षकांना पुन्हा हसवण्यासाठी तो सज्ज झाला.