इंडिगोचा पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला, कपिल शर्माचा चढला पारा; Video शेअर करत सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 09:06 AM2023-11-30T09:06:33+5:302023-11-30T09:07:50+5:30
कपिलने व्हिडिओ शेअर करत एकंदर परिस्थिती दाखवली आहे.
कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) इंडिगो एअरलाईन्सवर (Indigo) भडकला आहे. फ्लाईटला होणाऱ्या दिरंगाईमुळे त्याने एअरलाईन्सवर राग काढला आहे. इतरही प्रवासी वैतागलेले असताना कपिलने व्हिडिओ शेअर करत एकंदर परिस्थिती दाखवली आहे. या सर्व गोंधळात हतबल झालेले एअरपोर्ट अधिकारीही दिसत आहेत.
कपिल शर्माने ट्वीट करत लिहिले,'प्रिय Indigo6E, आधी तर तुम्ही प्रवाशांना सुरुवातीला बसमध्ये तासभर वाट पाहायला लावली आणि नंतर तुमची टीम म्हणते की पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला आहे. काय? खरंच? ८ वाजता फ्लाईट टेक ऑफ व्हायला हवी होती आता ९.२० झाले आहेत. तरी पायलट कॉकपिटमध्ये आलेला नाही. हे १८० प्रवासी परत कधी इंडिगो फ्लाईटने प्रवास करतील असं वाटतं का? कधीच नाही.#shameless'
Dear @IndiGo6E first you made us wait in the bus for 50 minz, and now your team is saying pilot is stuck in traffic, what ? Really ? we supposed to take off by 8 pm n it’s 9:20, still there is no pilot in cockpit, do you think these 180 passengers will fly in indigo again ? Never…
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) November 29, 2023
कपिलने आणखी एक ट्वीट करत वैतागलेल्या प्रवाशांचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये सर्वांना दुसऱ्या फ्लाईटमध्ये शिफ्ट केले जात आहे. तसंच प्रवासी अधिकाऱ्यांवर चिडलेले दिसत असून त्यांना प्रश्न विचारत आहेत.
People r suffering bcoz of you @IndiGo6E lying lying n lying, there r some old passengers on wheel chairs, not in a very good health condition. Shame on you #indigo 👎 pic.twitter.com/87OZGcUlPU
— Kapil Sharma (@KapilSharmaK9) November 29, 2023
कपिलच्या या ट्वीटवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. 'तुझ्या शोमध्ये कधी अडचणी आल्या नाहीत का?','तुम्ही नव्यानेच झालेल्या श्रीमंतांसारखं व्यवहार करत आहात, जरा मॅच्योर व्हा' अशा प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी कपिललाच धारेवर धरलं आहे. तर काही जणांनी इंडिगोचं हे नेहमीचंच असल्याचं म्हटलं आहे.