Kapil Sharma Biopic : कपिल शर्माचं आयुष्य मोठ्या पडद्यावर, लवकरच बायोपिक येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 05:38 PM2022-01-14T17:38:06+5:302022-01-14T17:38:45+5:30
Kapil Sharma Biopic : कोण साकारणार कपिलची भूमिका? काय आहे चित्रपटाचं नाव?
सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकची चलती आहे आणि आता आणखी एक बायोपिक तुमच्याआमच्या भेटीला येणार आहे. होय, आत्तापर्यंत राजकारणी, खेळाडू, कलाकार यांच्यावर बायोपिक बनवले गेले. आता एका कॉमेडियनव बायोपिक बनणार आहे. होय, टीव्हीवरचा कॉमेडी किंग कपिल शर्मावर (Kapil Sharma)लवकरच बायोपिक येणार आहे.
‘फुकरे’चे दिग्दर्शक मृगदीप सिंह लांबा कपिल शर्मावर बायोपिक बनवणार आहेत. ‘फनकार’ (Funkaar) असं या बायोपिकचं नाव असणार आहे. या चित्रपटात कपिलची भूमिका कपिल कोण साकारणार, हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. कपिल स्वत:च स्वत:ची भूमिका साकारणार की दुसरा अभिनेता त्याची व्यक्तिरेखा जिवंत करणार, हे लवकरच कळेल.
To the joy of Kapil Sharma fans, Producer Mahaveer Jain announces a delightful film on comedy king Kapil Sharma, 'FUNKAAR', under Lyca Productions. This lovable film on his life is Directed by Fukrey fame Mrighdeep Singh Lamba #KapilSharmaBiopicpic.twitter.com/AK7gNzXe7U
— Ramesh Bala (@rameshlaus) January 14, 2022
या चित्रपटात कपिल शर्माच्या संघर्षाबरोबर छोट्या पडद्यावरील सर्वात महागडा आणि यशस्वी कलाकारापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.
कपिल शर्मा हा एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला तरूण. वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा कपिल अवघ्या 23 वर्षांचा होता. वडिलांच्या निधनानंतर घराची सर्व जबाबदारी कपिलच्या खांद्यावर पडली. कपिलचे वडील पोलिसात हेड कॉन्स्टेबल होते. वडिलांच्या मृत्यूनंतर कपिलला त्यांची नोकरी मिळणार होती. परंतु,कपिलला वेगळं काही करायचं होतं. त्याने ही नोकरी करण्यास करण्यास नकार दिला. त्यानंतर कपिलच्या मोठ्या भावाला ही नोकरी मिळाली. सुरूवातीला कपिलने पीसीओ बूथवर काम करण्यास सुरू केले आणि संधी मिळताच मुंबईला आला.
मुंबईत कपिलने आपल्या करिअरची सुरुवात पंजाबी चॅनल शो ‘हंसदे हसांदे रहो’पासून केली होती. पण, त्याला खरी ओळख ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मधून मिळाली. लाफ्टर चॅलेंज जिंकल्यानंतर कपिलने कधीच मागे वळून पाहिलं नाही.