ते ट्वीट 9 लाखांत पडलं......; दारूच्या नशेत केलेल्या ‘त्या’ ट्वीटबद्दल पहिल्यांदाच बोलला कपिल शर्मा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 10:36 AM2022-01-06T10:36:32+5:302022-01-06T10:39:27+5:30

Kapil Sharma : मी पळून गेलो होतो, इतके पैसे खर्च केले की…; कपिल शर्माचा धक्कादायक खुलासा

Kapil Sharma I Am Not Done Yet Will Premiere On Netflix On January 28 Watch Funny Video | ते ट्वीट 9 लाखांत पडलं......; दारूच्या नशेत केलेल्या ‘त्या’ ट्वीटबद्दल पहिल्यांदाच बोलला कपिल शर्मा 

ते ट्वीट 9 लाखांत पडलं......; दारूच्या नशेत केलेल्या ‘त्या’ ट्वीटबद्दल पहिल्यांदाच बोलला कपिल शर्मा 

googlenewsNext

द कपिल शर्मा शो’मधून (The Kapil Sharma Show ) प्रेक्षकांना खळखळून हसवणारा सर्वांचा आवडता कपिल शर्मा (Kapil Sharma)आता ओटीटीवर डेब्यू करतोय. होय, पहिल्यांदा कपिल नेटफ्लिक्सवर ‘Kapil Sharma: I'm Not Done Yet’ हा शो घेऊन येतोय. येत्या 28 जानेवारीला या शोचा पहिला एपिसोड स्ट्रीम होणार आहे. कपिलने याचे दोन व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. यातला एक व्हिडीओ चांगला मजेदार आहे. यात कपिलने त्याच्या वादग्रस्त ट्वीट प्रकरणाचा उल्लेख केला आहे. होय, त्याचं हे ट्वीट प्रकरण चांगलंच गाजलं होतं. यात त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केलं होतं. हे ट्वीट केल्यानंतर मी लगेच मालदीवला पळून गेलो होतो. ते ट्वीट प्रकरण मला इतकं महाग पडलं की, माझे 9 लाख खर्च झालेत. इतके पैसे मी माझ्या शिक्षणावरही खर्च केले नव्हते, असं कपिल या व्हिडीओत सांगतोय.

तो व्हिडीओ म्हणतो, ‘त्या ट्वीटनंतर मी मी लगेच मालदीवसाठी पळून गेलो.  तिथं मी 8-9 दिवस राहिले. मालदिवला पोहोचलो आणि त्यांना इंटरनेट नसलेली रुम द्या अशी विनंती केली. यावर  तुम्ही लग्नानंतर इथं आला आहात का? असा प्रश्न त्यांनी मला केला. मी म्हटलं, नाही, लग्न करून नाही, ट्वीट करून आलोय. मी तिथे राहिलो आणि माझे 9 लाख खर्च झालेत. माझ्या शिक्षणावरही मी इतका पैसा खर्च केला नव्हतो. जितका त्या एका ओळीच्या ट्वीटसाठी केला.

पुढे तो म्हणतो, मी खरंच ट्वीटरवर केस करू इच्छितो. कारण ट्वीटरवाले अनेकदा राजकारण्यांच्या ट्वीटखाली ‘मॅनिप्युलेटेड ट्वीट’ लिहितात. त्यांनी माझ्या ट्वीटखालीही ‘ड्रंक ट्वीट, जस्ट इग्नोर हिम’ असं लिहायला हवं होतं. माझे पैसे वाचले असते. मला आपल्या देशाचं काही कळतं नाही. मी रात्री काही बोललो असेल तर तुम्हीही माझ्याशी रात्री बोला आणि विषय संपवा. कारण सकाळी माझी आयडिओलॉजी वेगळी असते. काही ट्वीट आपली जबाबदारी असून इतर हे दारुच्या बँड्रचा परिणाम असल्याचं म्हटलं.

काय होतं ते ट्वीट  
2016 साली कपिल शर्माने एक ट्वीट करत मुंबई महापालिकेविरोधात तक्रार केली होती. या ट्वीटमध्ये त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग केलं होतं. ‘मी गेल्या पाच वर्षांपासून 15 कोटींचा आयकर भरत असतानाही माझं ऑफिस तयार करण्यासाठी पालिकेला पाच लाखांची लाच द्यावी लागत आहे,’अशा आशयाचं ते ट्वीट होतं.  त्याच्या या ट्वीटवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. पालिकेने यानंतर कपिल शर्माच्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई केली होती.

Web Title: Kapil Sharma I Am Not Done Yet Will Premiere On Netflix On January 28 Watch Funny Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.