पीएम मोदींना भेटला कपिल शर्मा! अशी केली प्रशंसा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 12:07 PM2019-01-20T12:07:14+5:302019-01-20T12:08:26+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शनिवारी मुंबईत नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमाचे उद्घाटन केले. या सोहळ्याला बॉलिवूड व टीव्हीच्या दुनियेतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. कॉमेडियन कपिल शर्माही या सोहळ्याला पोहोचला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शनिवारी मुंबईत नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमाचे उद्घाटन केले. या सोहळ्याला बॉलिवूड व टीव्हीच्या दुनियेतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. कॉमेडियन कपिल शर्माही या सोहळ्याला पोहोचला. यावेळी कपिलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
कपिलने या भेटीचा फोटो आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोत नरेंद्र मोदी आणि कपिल शर्मा हसतहसत एकमेकांना भेटतांना दिसत आहेत. फोटोत ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये जेठालालची भूमिका साकारणारे टीव्ही अभिनेते दिलीप जोशी यांचीही एक झलक पाहायला मिळतेय.
Respected pm Sh @narendramodi ji,it was nice meeting u n great knowing ur inspiring ideas and progressive views about our film industry and our nation. N sir I must say u have a great sense of humor too! regards 🙏 pic.twitter.com/2fDpGC2qwh
— KAPIL (@KapilSharmaK9) January 19, 2019
या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये कपिलने मोदींच्या सेन्स ऑफ ह्युमरची प्रशंसा केली आहे. ‘मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आपल्याला भेटणे सुखद अनुभव राहिला. देश आणि चित्रपटसृष्टीच्या विकासाबद्दलचे आपले विचार आणि दूरदृष्टी प्रशंसनीय आहे आणि सर, मी हे नक्की सांगू इच्छितो की, आपल्याकडे कमालीचा सेन्स ऑफ ह्युमर आहे,’असे कपिलने लिहिले आहे.
गत दिवसांत पंतप्रधानांनी फिल्म इंडस्ट्रीतील प्रतिनिधींसोबत तीन बैठका घेतल्या. या भेटीत चित्रपटसृष्टीसमोरची आव्हाने, समस्या यावर चर्चा झालीत. या भेटीनंतर केंद्र सरकारने चित्रपटांच्या तिकिटांवरील जीएसटी दरात कपात केली होती.
कपिलबद्दल सांगायचे तर त्याचा ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा जोरात सुरु झाला आहे. गत वर्षभरानंतर कपिल टीव्हीवर परतला आहे.