तर काय असेल आलिया भट, वरूण धवन, सोनाक्षी सिन्हाचे निवडणूक चिन्ह?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 10:48 AM2019-04-15T10:48:52+5:302019-04-15T10:50:10+5:30
समजा आलिया भट, वरूण धवन, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर हे सगळे बॉलिवूडचे स्टार्स पुढेमागे निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेच तर त्यांचे निवडणूक चिन्ह काय असेल? थांबा....थांबा... या प्रश्नाच्या उत्तरासाठी स्वत:चे डोके खाजवण्याची गरज नाही. कारण खुद्द वरूण, आलिया, सोनाक्षी व आदित्य यांनी याचे उत्तर दिलेय.
समजा आलिया भट, वरूण धवन, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर हे सगळे बॉलिवूडचे स्टार्स पुढेमागे निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेच तर त्यांचे निवडणूक चिन्ह काय असेल? थांबा....थांबा... या प्रश्नाच्या उत्तरासाठी स्वत:चे डोके खाजवण्याची गरज नाही. कारण खुद्द वरूण, आलिया, सोनाक्षी व आदित्य यांनी याचे उत्तर दिलेय. वरूण, आलिया, सोनाक्षी व आदित्यचा ‘कलंक’ हा मल्टिस्टारर सिनेमा येत्या बुधवारी रिलीज होतोय. तत्पूर्वी काल रविवारी ‘कलंक’ची ही स्टारकास्ट ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचली. यादरम्यान कपिलच्या प्रश्नांना या स्टारकास्टने धम्माल उत्तरे दिलीत.
Tonight 9.30pm #TKSS@Sonypic.twitter.com/KMzQbkUEGb
— kiku sharda (@kikusharda) 13 अप्रैल 2019
सध्या देशात निवडणुकीचे वातावरण आहे. अशात तुम्ही निवडणूक लढवलीच तर तुमचे निवडणूक चिन्ह काय असेल? असा प्रश्न कपिलने या सर्वांना केले. यावर सगळ्यांनीच मजेशीर उत्तरे दिलीत. मी निवडणूक लढलोच तर माझे निवडणूक चिन्ह ‘कच्छा’ असेल, असे वरूण म्हणाला. ‘कच्छा सबसे अच्छा. कच्छा है तो इज्जत है, अपने कच्छे से मतलब रखे,’ असे वरूण यावेळी म्हणाला. आदित्य राय कपूरने त्याचे निवडणूक चिन्ह ‘आशिकी 2’ मधील जॅकेट असेल, असे सांगितले. जॅकेटच्या आत राहण्याचा अर्थ हाच की, प्रेमी जोडप्यांना लपण्याची गरज नाही, असा आपल्या या निवडणूक चिन्हाचा आगळावेगळा अर्थही त्याने समजावून सांगितला.
Catch your favorites @Varun_dvn@aliaa08@sonakshisinha & #AdityaRoyKapoor tonight on #TheKapilSharmaShow on @SonyTV#Kalank#KalankOnTkss#tksspic.twitter.com/hG6D3VCk6V
— कपिल शर्मा (@KapilSharmaK9) 13 अप्रैल 2019
सगळ्यांत इंटरेस्टिंग म्हणजे, आलियाचे निवडणूक चिन्ह. मी निवडणुकीत उभी झाले तर माझे निवडणूक चिन्ह प्लेट असेल असे ती म्हणाली. प्लेट हेच निवडणूक चिन्ह का? असे विचारल्यावर आलियाने चांगलेच मजेशीर उत्तर दिले. मी राजकारणात खूप सारे ‘चमचे’ पाहिलेत. पण प्लेट पाहिली नाही. त्यामुळे माझे निवडणूक चिन्ह प्लेट असेल, असे ती म्हणाली. वरूण, आलिया व आदित्यनंतर उरली ती सोनाक्षी. तर माझे निवडणूक चिन्ह ‘खामोश’ साईन असेल असे ती म्हणाली. माझी पार्टी बोलणार कमी आणि काम जास्त करेल,असे ती म्हणाली. या संपूर्ण स्टारकास्टने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले.