कपिल शर्माने घेतली मनमोहन सिंग यांची भेट, अमृतसरच्या आठवणींना दिला उजाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 08:43 PM2019-02-05T20:43:33+5:302019-02-05T20:43:54+5:30
बॉलिवूडचा प्रसिद्ध कॉमेडीयन अभिनेता कपिल शर्माने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली आणि अमृतसरच्या आठवणींना उजाळा दिला.
बॉलिवूडचा प्रसिद्ध कॉमेडीयन अभिनेता कपिल शर्माने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली आणि अमृतसरच्या आठवणींना उजाळा दिला. मनमोहन सिंग आणि त्यांची पत्नी गुरुशरण कौर यांच्यासोबतचा फोटो कपिलने ट्विटरवर शेअर केला आहे.
या फोटोसोबत कपिलने लिहिले आहे, "अतिशय प्रेमाने आदरातिथ्य आणि अमृतसरशी संबंधित आठवणींना उजाळा दिल्याबद्दल मनमोहन सिंग यांचे आभार, विशेषतः आमच्या कॉलेज आणि खाण्याबद्दल. तुमच्यासारख्या विनम्र आणि चांगल्या राजकारण्याशी भेटीचा योग सन्मानाची गोष्ट आहे.
Thank you respected @_ManmohanSingh ji for the warmth, hospitality and a heart to heart conversation about our Amritsari roots,especially about our college and food. Was an honour meeting such a humble and simple statesman like you, and receiving blessings from ma'am. Regards 🙏 pic.twitter.com/byiAbiDxCM
— KAPIL (@KapilSharmaK9) February 5, 2019
सध्या कपिल शर्मा पुन्हा एकदा 'द कपिल शर्मा शो'चे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमाचा निर्माता बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान आहे.
कॉमेडीकिंग कपिल शर्माने गत बुधवारी गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधली.जालंधर येथे कपिलचे हे लग्न पार पडले. गिन्नी आणि कपिल शर्मा दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. तिथेच दोघांची ओळख झाली आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. गिन्नीसह कपिलने ‘हस बलिय’ या शोमध्येही एकत्र कामही केले आहे.
गतवर्षी मार्चमध्ये ‘मिट माय वाईफ’अशी पोस्ट टाकून कपिलने गिन्नीसोबतचे रिलेशन जगजाहिर केले होते. यानंतर कपिल व सुनील ग्रोव्हर यांच्या भांडणाचा एक अंग गाजला होता. याचदरम्यान मध्यंतरी कपिल आणि गिन्नीच्या ब्रेकअपची बातमीही आली होती. पण कालांतराने ही बातमी अफवा असल्याचे सिद्ध झाले होते. कॉलेजमध्ये असताना गिन्नीच्या नाटकांच्या प्रयोगांमध्येही तो तिची खूप मदत करायचा. गत वर्षभरात कपिलच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली. तो अनेक वादांत सापडला. डिप्रेशन, व्यसन आदींमध्ये गुरफटला. पण आता तो या सगळ्यांतून बाहेर पडला आहे.