या अभिनेत्याला वडिलांसमोरच द्यावा लागला किसिंग सीन, अभिनेत्याची अवस्था झाली पाहण्यासारखी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 02:58 PM2019-08-28T14:58:37+5:302019-08-28T14:58:50+5:30

सध्या बॉलिवूडमध्ये सारा, जान्हवी आणि अनन्यानंतर इतर स्टार किड्सही आपल्या डेब्यूसाठी सज्ज झाले आहेत.

karan deol reveals he was feeling awkward doing kissing scene in front of dad sunny deol | या अभिनेत्याला वडिलांसमोरच द्यावा लागला किसिंग सीन, अभिनेत्याची अवस्था झाली पाहण्यासारखी

या अभिनेत्याला वडिलांसमोरच द्यावा लागला किसिंग सीन, अभिनेत्याची अवस्था झाली पाहण्यासारखी

googlenewsNext

सध्या बॉलिवूडमध्ये सारा, जान्हवी आणि अनन्यानंतर इतर स्टार किड्सही आपल्या डेब्यूसाठी सज्ज झाले आहेत. सनी देओलचा मुलगा करण देओल बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. 'पल पल दिल के पास'मधून तो बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाला आहे. यात त्याच्यासोबत साहिर बंबासुद्धा दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन दुसरे तिसरे कुणी करत नसून स्वत: सनी देओल करतोय. पल पल दिल के पास हा चित्रपट 20 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. 


दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार एका मुलाखती दरम्यान करण देओलने सिनेमातील किसिंग सीन्सशी संबंधीत किस्सा शेअर केला. करण म्हणाला वडिलांसमोर किसिंग सीन शूट करताना मला प्रचंड दडपण आले होते. मी परिस्थिती खूप आवडल्यासारखी झाली होती. मात्र त्यांनतर मी सगळं विसरलो कारण किसिंग सीन हा त्या कथेची गरज होती. हा एक रोमाँटिक सिनेमा आहे.  




5 ऑगस्टला सनीने ट्विटरवर या सिनेमाचे टिझर शेअर केले होते.हा टीजर 5 ऑगस्टलाच प्रदर्शित करण्यामागे एक खास कारण आहे. सनीने 5 ऑगस्टलाच त्याच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यामुळे त्याच्यासाठी हा अतिशय खास दिवस आहे.

त्याचा बेताब हा पहिला चित्रपट 5 ऑगस्ट 1983 ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले होते. या चित्रपटात आपल्याला सनी आणि अमृता सिंग यांची जोडी पाहायला मिळाली होती.  त्यामुळे हेच प्रेम आणि यश करणला मिळावे म्हणून कदाचित सनीने याच दिवशी शेअर केला होता. 

Web Title: karan deol reveals he was feeling awkward doing kissing scene in front of dad sunny deol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.