बॉक्स ऑफिसवर झिरो अन् फी मागतात करोडो...! करण जोहर वैतागला, पण कुणावर?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 05:00 PM2021-12-28T17:00:18+5:302021-12-28T17:02:25+5:30
Karan Johar : सध्या करण आणखी नव्या चेहऱ्यांना फिल्मी दुनियेत लॉन्च करण्याचा विचार करतोय. पण एक अडचण आहे. होय, नव्या जनरेशनचे नखरे इतके की, करणही वैतागला आहे.
करण जोहरने (Karan Johar) फिल्म इंडस्ट्रीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली. भलेही त्याच्यावर नेपोटिजमचा आरोप झाला. पण नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचं काम त्यानं थांबवलं नाही. आलिया भट, वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, जान्हवी कपूर, अनन्या पांडे अशा अनेकांना करणने स्टार केलं. सध्या करण नव्या पिढीतील आणखी नव्या चेहऱ्यांना फिल्मी दुनियेत लॉन्च करण्याचा विचार करतोय. पण एक अडचण आहे. होय, नव्या जनरेशनचे नखरे इतके की, करणही वैतागला आहे.
‘ फिल्म कंपेनियन’ या पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत करणने हा वैताग बोलून दाखवला. ‘मेगास्टार्स व ए-लिस्टर्स बिझनेस आणतात. त्यामुळे त्यांच्या डिमांड मी समजू शकतो. पण आजकाल जो तो कोटीत फी मागतो. अनेकदा नव्या पिढीचे कलाकार विनाकारण भलीमोठी फी डिमांड करतात. मला तर अनेकदा आश्चर्य वाटतं. यापैकी अनेकांनी अद्याप स्वत:ला बॉक्स ऑफिसवर स्वत:ला सिद्ध केलेलं नाही. पण तरीही त्यांना 20-30 कोटी फी हवी आहे. अनेकदा इच्छा नसूनही मला अशा लोकांना त्यांचं रिपोर्ट कार्ड दाखवावं लागतं. हॅलो, हे बघ तुझ्या चित्रपटाचं ओपनिंग बघ आणि तू मला इतके कोटी मागतो आहेस, असं मला म्हणावं लागतं, ’ असं करण म्हणाला.
‘मी टेक्निशिअन्सला डॉलरमध्ये फी द्यायला तयार आहे. माझ्यामते, खरोखर ते सिनेमाला स्पेशल बनवतात. ज्यांनी अद्याप स्वत:ला सिद्धच केलेलं नाही अशांना 20-30 कोटी देण्यापेक्षा मी टेक्निशिअन्सला पैसा देईल, असंही तो म्हणाला. प्रत्येक कलाकाराकडे आजकाल मॅनेजर असतात. ते मॅनेजर, प्रत्येक चित्रपटानंतर कलाकारांना फी वाढवण्याचा सल्ला देतात आणि निर्मात्यांचा वैताग वाढतो, असंही तो म्हणाला.