'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलीला करण जोहर करतोय लॉन्च, जाणून घ्या कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 11:41 AM2022-03-03T11:41:09+5:302022-03-03T11:55:53+5:30

चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या 'बेधडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय.

Karan Johar launches this famous Bollywood actor's daughter, find out who she is | 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलीला करण जोहर करतोय लॉन्च, जाणून घ्या कोण आहे ती?

'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलीला करण जोहर करतोय लॉन्च, जाणून घ्या कोण आहे ती?

googlenewsNext

चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं आहे.  करण जोहर (Karan Johar) पुन्हा एकदा एक मोठं सरप्राइज देण्यास सज्ज आहे. त्यानं एक व्हिडिओ शेअर केला होता त्यात त्यानं ३ मार्च रोजी म्हणजेच तो तीन नव्या चेहऱ्यांना लाँच करणार असल्याचं म्हटलं होतं. 

आज करण जोहरने त्या तीन नव्या चेहऱ्यांच्या नावावरुन पडद्या उचलला आहे. या यादीत पहिले नाव लक्ष्य लालवाणी(Lakshya Lalwani)चे आहे. दुसरीकडे, संजय आणि महीप कपूरची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) आणि तिसरं नाव गुरफतेह पिरजादा(Gurfateh Pirzada)चं आहे .  या चित्रपटातून तिघे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. शशांक खेतान दिग्दर्शित 'बेधडक' या आगामी चित्रपटात हे तिघे झळकणार आहेत. ही बातमी शेअर करत करणने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे.

'बेधडक' सिनेमातून करण जोहर या तीन नव्या चेहऱ्याना लाँच करतो आहे.लक्ष्य लालवानी हा एक टेलिव्हिजन अभिनेता आहे ज्याने चित्रपटांच्या जगात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे शनाया कपूर (Shanaya Kapoor)ही बॉलिवूड अभिनेता संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी आहे. शनायाच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून बी-टाऊनमध्ये रंगली होती. अखेर आज त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच सोशल मीडियावर शनायाच्या मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर शनाया सक्रिय असते. 

Web Title: Karan Johar launches this famous Bollywood actor's daughter, find out who she is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.