-तर 'Student of the Year'नं करण जोहरचं दिवाळं काढलं असतं...; इतक्या वर्षांनंतर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 03:10 PM2023-01-13T15:10:05+5:302023-01-13T15:10:13+5:30

Karan Johar, Student of the Year : २०१२ साली करणने आलिया भट, वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा यांना लॉन्च केलं होतं. या चित्रपटाचं नाव अर्थातच तुम्हाला ठाऊक आहे. या चित्रपटाचं नाव होतं, 'स्टुडंट ऑफ द ईअर'...

karan johar reveals student of the year face losses of 20 crore on box office | -तर 'Student of the Year'नं करण जोहरचं दिवाळं काढलं असतं...; इतक्या वर्षांनंतर केला खुलासा

-तर 'Student of the Year'नं करण जोहरचं दिवाळं काढलं असतं...; इतक्या वर्षांनंतर केला खुलासा

googlenewsNext

करण जोहर (Karan Johar) बाॅलिवूडचा दिग्गज दिग्दर्शक, निर्माता व अभिनेता. पण याशिवाय आणखी एका गोष्टीसाठी करण ओळखला जातो. ते म्हणजे स्टार किड्सला लॉन्च करणं. होय, आत्तापर्यंत करणने अनेकांना लॉन्च केलं. २०१२ साली करणने आलिया भट, वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा यांना लॉन्च केलं होतं. या चित्रपटाचं नाव अर्थातच तुम्हाला ठाऊक आहे. या चित्रपटाचं नाव आहे, 'स्टुडंट ऑफ द ईअर'. म्हणायला 'स्टुडंट ऑफ द ईअर' (Student of the Year) हा सिनेमा हिट होता. पण प्रत्यक्षात या चित्रपटामुळे करण जोहरला २० कोटींचा तोटा सहन करावा लागला होता. होय, एका मुलाखतीत खुद्द करण जोहरने हा खुलासा केला.

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत तो 'स्टुडंट ऑफ द ईअर' बद्दल बोलला. तो म्हणाला, 'स्टुडंट ऑफ द ईअर' या चित्रपटाने ७० कोटींची कमाई केली होती. पण या चित्रपटावर यापेक्षा कितीतरी अधिक पैसा खर्च झाला होता. या चित्रपटामुळे आम्हाला १५ ते २० कोटी नुकसान झालं होतं. आलिया, वरूण व सिद्धार्थला आम्ही तीन सिनेमांसाठी साईन केलं होतं. यात हंसी तो फंसी, हम्टी शर्मा की दुल्हनियां, २ स्टेट्स या तीन चित्रपटांचा समावेश होता. तिन्ही सिनेमांचा बजेट अगदी तंतोतंत होता. या तिन्ही सिनेमांनी ठीक ठीक कमाई केली आणि 'स्टुडंट ऑफ द ईअर'मुळे झालेला २० कोटींचं नुकसान आम्ही भरून काढू शकलो. नाहीतर चांगलाच चुना लागला असता.

करण जोहरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच त्याने दिग्दर्शित केलेला रॉकी और रानी की प्रेमकहानी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात आलिया भट, रणवीर सिंग, जया बच्चन, धर्मेन्द्र, शबाना आझमी मुख्य भूमिकेत आहेत. येत्या एप्रिलमध्ये हा सिनेमा रिलीज होतोय.

Web Title: karan johar reveals student of the year face losses of 20 crore on box office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.