'सिनेमा धंदा नही, धर्म है साड्डा...', करण जोहरच्या 'शोटाइम' या वेबसीरिजचा टीझर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 04:45 PM2023-12-20T16:45:13+5:302023-12-20T16:47:37+5:30

करण जोहरची 'शोटाईम' नावाची वेब सिरीज पुढच्या वर्षात रिलीज होणार आहे.

Karan Johar's 'Showtime' Web Series Teaser Out | 'सिनेमा धंदा नही, धर्म है साड्डा...', करण जोहरच्या 'शोटाइम' या वेबसीरिजचा टीझर आऊट

'सिनेमा धंदा नही, धर्म है साड्डा...', करण जोहरच्या 'शोटाइम' या वेबसीरिजचा टीझर आऊट

बॉलिवूडसाठी वर्ष २०२३ हे चांगले राहिले असून आता २०२४ ची तयारीही जोमात सुरू आहे. पुढील वर्षी अनेक मोठे चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होणार आहेत.  दिग्दर्शक करण जोहरची 'शोटाईम' नावाची वेब सिरीज पुढच्या वर्षात रिलीज होणार आहे.  आज या वेब सिरीजचा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. 

करणने हा टीझर शेअर करताना लिहिले, 'लाइट, कॅमेरा आणि अॅक्शनवर चालणाऱ्या जगात तुमचे स्वागत आहे. शोटाइम ही एक वेब सीरिज आहे ज्यामध्ये प्रत्येकजण सत्तेसाठी मर्यादा ओलांडताना दिसेल. 'नेपोटिज्म के मुखौटे के पीछे आखिरकर हर आऊटसायडर, इनसायडर बनना चाहता है आणि सिनेमा धंदा नही, धर्म है साड्डा', असे डायलॉग या सिनेमात आहेत. 

 चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस जग या ५० सेंकदाच्या या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. इमरान हाश्मीशिवाय मौनी रॉय मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. नसीरुद्दीन शाह, केके मेनन, श्रेया सरन आणि टीव्ही अभिनेत्री महिमा मकवाना देखील वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. ही सीरिज पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये  OTT प्लॅटफॉर्म Hotstar वर प्रदर्शित केली जाईल. विशेष म्हणजे या सीरिजमध्ये करण जोहरने नेपोटिझमवरही भाष्य केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता संपुर्ण बेवसीरिजची उत्सुकता लागली आहे.

करण जोहरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, तो तब्बल ७ वर्षांनी दिग्दर्शनात परतला आहे. त्याचा काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमा हिट ठरला. सध्या करण आगामी सिनेमांच्या तयारित व्यस्त आहे. सिद्धार्थ मल्होत्राला घेऊन तो 'योद्धा' सिनेमा आणत आहे. शिवाय तो 'कॉफी विथ करण सिझन ८' मधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 
 

Web Title: Karan Johar's 'Showtime' Web Series Teaser Out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.