फिल्मी दुनियेतील आणखी एक लव्हस्टोरी संपली...? अनुषा दांडेकर-करण कुंद्राचे ब्रेकअप?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 10:51 AM2020-04-14T10:51:32+5:302020-04-14T10:52:52+5:30

... पण चर्चा हीच आहे!!

karan kundrra and anusha dandekar relationship over breakup-ram |  फिल्मी दुनियेतील आणखी एक लव्हस्टोरी संपली...? अनुषा दांडेकर-करण कुंद्राचे ब्रेकअप?

 फिल्मी दुनियेतील आणखी एक लव्हस्टोरी संपली...? अनुषा दांडेकर-करण कुंद्राचे ब्रेकअप?

googlenewsNext
ठळक मुद्देआधी करण हा कृतिका कामरासोबत रिलेशनशिपमध्ये होता.

अभिनेत्री शिबानी दांडेकर एकीकडे फरहान अख्तरच्या प्रेमात आंकठ बुडालीय. दुसरीकडे शिबानीची बहीण अनुषा दांडेकर ही सुद्धा टीव्ही स्टार करण कुंद्राच्या प्रेमात वेडी झाली होती. पण आता कदाचित फिल्मी दुनियेतील आणखी एक लव्हस्टोरी संपली आहे. होय, अनुषा दांडेकर व करण कुद्रा यांची लव्हस्टोरी संपल्यात जमा असल्याचे कळतेय. अद्याप दोघांनीही अधिकृतपणे याचा खुलासा केलेला नाही. पण चर्चा हीच आहे.

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, करण व अनुषा यांच्या नात्यात तूर्तास कुरबुरी सुरु आहेत. एका सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या या वृत्तात म्हटल्याप्रमाणे, अनुषा व करण गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. काही वर्षांपूर्वी दोघांनीही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला दोघेही वांद्रयाच्या एका अपार्टमेंटमध्ये एकत्र राहत. यानंतर दोघेही अंधेरीच्या एका अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले होते. पण आता दोघेही वेगळे राहत आहेत.

 अलीकडे इन्स्टाग्राम लाइव्हदरम्यान अनुषाला करणसोबतच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला तिने विचित्र उत्तर दिले होते. ‘मला सगळे लग्नाबद्दल विचारत आहेत. याच्या उत्तरात मी एवढेच सांगू इच्छिते की, जेव्हा पुढची कथा लिहिली जाईल तेव्हा मी तुम्हाला पान पलटायला सांगेल. परिकथेत होते, अगदी तसे...,’ असे अनुषा म्हणाली होती. तिच्या या उत्तरावरून तिच्यात व करणमध्ये काहीतरी बिनसल्याचा कयास बांधला जात होता. आता खरे काय ते अनुषा व करणलाच ठाऊक.

अनुषा  व करण दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत होते. सोशल मीडियावरच्या त्यांच्या फोटोत दोघांचीही केमिस्ट्री पाहण्यासारखी होती. आधी करण हा कृतिका कामरासोबत रिलेशनशिपमध्ये होता.

कृतिकानंतर करण अनुषाच्या प्रेमात पडला. अनुषा दांडेकर हिच्याबद्दल सांगायचे झाल्यास ती इंडो-ऑस्ट्रेलियन एमटीव्ही वीजे आहे. सोबत गायिका अशीही तिची ओळख आहे. अनुष्काचा जन्म ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमध्ये झाला. देल्ही बेली, सिटी ऑफ गोल्ड आणि एंथोनी कौन है सारख्या चित्रपटात तिने अभिनय केला आहे.

Web Title: karan kundrra and anusha dandekar relationship over breakup-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.