अनुषा दांडेकरसोबतच्या ब्रेकअपबाबत करण कुंद्राने सोडले मौन, केला 'हा' मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 02:54 PM2020-04-20T14:54:51+5:302020-04-20T15:13:19+5:30

गेल्या काही दिवसांपासून करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकरच्या ब्रेकअपची चर्चा सुरु आहे.

karan kundrra talk about his breakup rumours with anusha dandekar gda | अनुषा दांडेकरसोबतच्या ब्रेकअपबाबत करण कुंद्राने सोडले मौन, केला 'हा' मोठा खुलासा

अनुषा दांडेकरसोबतच्या ब्रेकअपबाबत करण कुंद्राने सोडले मौन, केला 'हा' मोठा खुलासा

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकरच्या ब्रेकअपची चर्चा सुरु आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, करण कुंद्राने हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना आम्ही एकत्र आहोत, आपलं ब्रेकअप झालं नसल्याचा खुलासा केला. करण म्हणाला, काही दिवस आम्ही एकत्र राहतो काही दिवस आपल्या घरी. मी हरियाणामध्ये शूटिंग करत होतो आणि लॉकडाऊनच्या आधी मुंबईत आलो.  सध्या आम्ही दोघे एकत्र राहत नाही आहोत, त्यामुळे सगळ्यांना वाटतेय आमचं ब्रेकअप झाले आहे. मी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नाही आहे म्हणून आमच्या ब्रेकअपची अफवाह पसरवण्यात आली. मला या सगळ्या गोष्टींमुळे फरक पडत नाही मात्र अनुषा इमोशनल आहे तिला फरक पडतो. 


अनुषा व करण दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत होते. सोशल मीडियावरच्या त्यांच्या फोटोत दोघांचीही केमिस्ट्री पाहण्यासारखी होती. आधी करण हा कृतिका कामरासोबत रिलेशनशिपमध्ये होता.


कृतिकानंतर करण अनुषाच्या प्रेमात पडला. अनुषा दांडेकर हिच्याबद्दल सांगायचे झाल्यास ती इंडो-ऑस्ट्रेलियन एमटीव्ही वीजे आहे. सोबत गायिका अशीही तिची ओळख आहे. अनुषाचा जन्म ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमध्ये झाला. देल्ही बेली, सिटी ऑफ गोल्ड आणि एंथोनी कौन है सारख्या चित्रपटात तिने अभिनय केला आहे.

Web Title: karan kundrra talk about his breakup rumours with anusha dandekar gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.