करीना कपूरने इतक्या वेळा नाकारले होते सैफ अली खानचे प्रपोजल, मग लग्नासाठी दिला होता होकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 05:24 PM2021-03-25T17:24:45+5:302021-03-25T17:25:06+5:30

सैफ अली खानचे लग्नाचे प्रपोजल नाकारल्याचे खुद्द करीना कपूर खानने एका मुलाखतीत सांगितले होते.

Kareena Kapoor had rejected Saif Ali Khan's proposal so many times, then said yes to marriage | करीना कपूरने इतक्या वेळा नाकारले होते सैफ अली खानचे प्रपोजल, मग लग्नासाठी दिला होता होकार

करीना कपूरने इतक्या वेळा नाकारले होते सैफ अली खानचे प्रपोजल, मग लग्नासाठी दिला होता होकार

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान भलेही आता सैफ अली खानसोबत आनंदी विवाहित जीवन व्यतित करते आहे. मात्र अशी एक वेळ होती जेव्हा सैफच्या लग्नाचे प्रपोजल एकदा नाही तर चक्क दोनदा करीनाने नाकारले होते. 

याबद्दल करीना कपूरने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिने सैफ अली खानचे लग्नाचे प्रपोजल दोनदा नाकारले होते. चित्रपट टशनच्या शूटिंगदरम्यान सैफने पहिल्यांदा तिच्याकडे लग्नाबद्दल उल्लेख केला होता तेव्हा ते ग्रीसमध्ये शूटिंग करत होते. 


करीना म्हणाली की, सैफ मला म्हणायचा की आपल्याला लग्न केले पाहिजे. त्याने ग्रीस व्यतिरिक्त लडाखमध्येदेखील हीच गोष्ट सांगितली तेव्हा मी म्हटले की मी तुम्हाला ओळखत नाही. खरेतर मला त्यांना आणखीन चांगल्यारितीने जाणून घ्यायचे होते.


काही कालावधीनंतर करीना कपूरने सैफ अली खानला लग्नासाठी होकार दिला आणि त्यांनी २०१२ साली लग्न केले. करीनाने सैफला लग्नाच्या निर्णयाबद्दल सांगितले होते की, मला वाटते की मी जीवनातील योग्य निर्णय घेतला होता. मी सैफला हेही म्हटलं होते की, मी कधी काम करणे थांबवणार नाही त्यावर सैफ म्हणाला होता की, तू नेहमी काम करू शकते.


करीना सैफची दुसरी पत्नी बनली. त्यामुळेच तिला लग्नाआधी बरेच सल्ले देण्यात आले होते. लोकांनी करीनाला म्हटले होते की, सैफ घटस्फोटीत आहे. दोन मुलांचा वडील आहे. तुझे करिअर बर्बाद होईल. असे बरेच काही सांगितले होते. पण करीना आपल्या निर्णयावर ठाम राहिली. आता सैफ आणि करीना दोन मुलांचे पालक आहेत.


 

Web Title: Kareena Kapoor had rejected Saif Ali Khan's proposal so many times, then said yes to marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.