Kareena Kapoor Khan : सिनेमा नसेल तर मनोरंजन कसं होणार, Boycott ट्रेंडवर करिनाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 11:15 AM2023-01-23T11:15:56+5:302023-01-23T11:19:58+5:30

पठाणच्या वादात करिनाने केलं मत व्यक्त. म्हणाली, आयुष्यात आनंद हवा असेल तर सिनेमा असणं गरजेचं आहे.

kareena kapoor khan didnt agree with boycott trend says if there is no cinema how will you get entertained | Kareena Kapoor Khan : सिनेमा नसेल तर मनोरंजन कसं होणार, Boycott ट्रेंडवर करिनाचा सवाल

Kareena Kapoor Khan : सिनेमा नसेल तर मनोरंजन कसं होणार, Boycott ट्रेंडवर करिनाचा सवाल

googlenewsNext

Kareena Kapoor Khan :  बॉलिवुड अभिनेत्री करिना कपूर खान अनेकदा रोखठोक विधानं करत असते. कित्येकदा ती ट्रोलही झाली आहे. आधीच नेपोटिझमुळे सोशल मीडियावर स्टार किड्स ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतात. त्यात सध्याच्या काळात नेटकरी बॉलिवुडप्रती इतके आक्रमक झालेत की 'बॉयकॉट बॉलिवुड' हा ट्रेंड चांगलाच जोरात सुरु आहे. या ट्रेंडवर करिना कपूरने मत व्यक्त केले आहे. 

कोलकाता येथील इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स-यंग लीडर्स फोरम मध्ये  करिना कपूर सहभागी झाली होती. या कार्यक्रमात तिने बॉयकॉट बॉलिवुड ट्रेंडवर भाष्य केले. करिना म्हणाली, 'मी याच्याशी सहमत नाही. जर असा ट्रेंड सुरु राहिला तर आम्ही मनोरंजन कसं करायचं. तुमच्या जीवनात आनंद कसा राहील जो सर्वांच्या आयुष्यात असला पाहिजे. जर सिनेमा नसेल तर मनोरंजन कसं होईल.'

बॉयकॉट बॉलिवुडचा फटका करिना कपूरलाही बसला आहे. आमिर खान (Amir Khan) आणि करिनाचा बिग बजेट चित्रपट लाल सिंग चढ्ढा (Laal Singh Chadda) बॉक्सऑफिसवर जोरदार आपटला. याचा दोघांनाही चांगलाच धक्का बसला. आमिरने चित्रपटात काही अशा गोष्टी दाखवल्या ज्या प्रेक्षकांना अजिबात पटल्या नाहीत. तसेच देश सोडून जाण्याचे आमिरचे वक्तव्य पुन्हा व्हायरल करत लोकांनी सिनेमा फ्लॉप केला. याशिवाय करिना कपूरच्याही एका जुन्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यांना आमचा सिनेमा नाही बघायचा त्यांनी नका बघू असं बेधडक वक्तव्य तिने केलं होतं. याच सर्व कारणांमुळे लाल सिंग चड्डाला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला नाही. आमिर खान ला तर या सिनेमाकडून खूप अपेक्षा होत्या. सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर त्याने थेट कामातूनच ब्रेक घेतला. 

90 टक्के bollywood ड्रग्स घेत नाही, 'बॉयकॉट' टॅग दूर करा; सुनील शेट्टीची योगींकडे मागणी

बॉयकॉट बॉलिवुड ट्रेंड कधी सुरु झाला ?

२०२० मध्ये सुशांतसिंग राजपुतने आत्महत्या केली तेव्हापासून बॉयकॉट बॉलिवुड ट्रेंड प्रकर्षांने दिसू लागला. बॉलिवुडमधील घराणेशाहीवर, खानगिरीवर, कलाकारांच्या एकंदर विधानांवर लोक कमालीचे संतापलेय. यामुळे सोशल मीडियावर काही कलाकारांचे चित्रपट हिट होऊ द्यायचे नाही म्हणून बॉयकॉट हा ट्रेंड सुरु झाला. सध्या शाहरुख खानच्या 'पठाण' सिनेमावरही बॉयकॉट ट्रेंडचे सावट आहे.  

Web Title: kareena kapoor khan didnt agree with boycott trend says if there is no cinema how will you get entertained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.