करिना कपूर मानधनावर अडली, ‘हिंदी मीडियम 2’ला दिला नकार!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 06:00 AM2019-03-01T06:00:00+5:302019-03-01T06:00:02+5:30
होय, ‘हिंदी मीडियम 2’मध्ये करिना इरफान खानसोबत झळकणार, अशी चर्चा जोरात होती. पण आता या चर्चेला पूर्णविराम लावणारी बातमी आहे.
ठळक मुद्देकरिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ‘गुड न्यूज’नंतर करिना लगेच ‘तख्त’ या चित्रपटात बिझी होणार आहे.
करिना कपूर सध्या अक्षय कुमारसोबत ‘गुड न्यूज’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटाशिवाय अन्य एका चित्रपटाशी करिनाचे नाव जोडले गेले होते. या चित्रपटाचे नाव होते, ‘हिंदी मीडियम 2’. होय, ‘हिंदी मीडियम 2’मध्ये करिना इरफान खानसोबत झळकणार, अशी चर्चा जोरात होती. पण आता या चर्चेला पूर्णविराम लावणारी बातमी आहे. ताजी चर्चा खरी मानाल तर करिनाने म्हणे या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे.
या नकाराचे कारणही समोर आले आहे. ते म्हणजे, फी. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हिंदी मीडियम 2’ची स्क्रिप्ट वाचल्यानंतर करिनाने या चित्रपटाला होकार दिला होता. पण मानधनाची गोष्ट आली आणि करिना अडली. करिनाने या चित्रपटासाठी ८ कोटी रूपये इतकी फी मागितली. पण निर्मात्यांनी इतकी मोठी रक्कम देण्यास नकार दिला. निर्माता ५ कोटीवर अडले आणि करिना ८ कोटींवर. शेवटी कुठलाच तोडगा न निघाल्याने अखेर करिनाने चित्रपटास नकार कळवला. करिनाच्या नकारानंतर ‘हिंदी मीडियम 2’च्या मेकर्सनी नव्या हिरोईनचा शोध चालवला असल्याचे कळतेय. विश्ोष म्हणजे, मेकर्सच्या सर्च लिस्टमध्ये राधिका आपटेचे नाव सर्वात वर आहे. ‘हिंदी मीडियम’मध्ये इरफानच्या अपोझिट पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर दिसली होती.
करिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ‘गुड न्यूज’नंतर करिना लगेच ‘तख्त’ या चित्रपटात बिझी होणार आहे. करण जोहरच्या या मल्टीस्टारर चित्रपटात करिनाशिवाय रणवीर सिंग, अनिल कपूर, जान्हवी कपूर, भूमी पेडणेकर, विकी कौशल असे सगळे स्टार्स आहेत.