‘दबंग 3’मध्ये थिरकणार ‘फेव्हिकोल से’ गर्ल करिना कपूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 01:13 PM2019-02-03T13:13:12+5:302019-02-03T13:15:41+5:30

होय,‘दबंग 2’ मधील ‘फेव्हिकोल से’ हे करिनावर चित्रीत आयटम साँग प्रचंड गाजले. आता ‘दबंग 3’मध्येही करिना अशाच एका धम्माल गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.

kareena kapoor khan will do item number in dabangg 3 after fevicol se |  ‘दबंग 3’मध्ये थिरकणार ‘फेव्हिकोल से’ गर्ल करिना कपूर!

 ‘दबंग 3’मध्ये थिरकणार ‘फेव्हिकोल से’ गर्ल करिना कपूर!

googlenewsNext

‘दबंग 2’मधील आपल्या स्पेशल डान्स नंबरने सगळ्यांना वेड लावणारी करिना कपूर आता ‘दबंग 3’साठी सज्ज झाली आहे. होय,‘दबंग 2’ मधील ‘फेव्हिकोल से’ हे करिनावर चित्रीत आयटम साँग प्रचंड गाजले. आता ‘दबंग 3’मध्येही करिना अशाच एका धम्माल गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. प्रभू देवा या आयटम साँगची कोरिओग्राफी करणार आहे.
रोहित शेट्टीला भेटल्यानंतर करिना अरबाज खानला भेटायला पोहोचली आहे. तुम्हाला ठाऊक आहेच की, अरबाज हा ‘दबंग’सीरिजचा निर्माता आहे. ‘दबंग’मध्ये मलायका अरोरा हिने ‘मुन्नी बदनाम हुई’ हे आयटम साँग केले होते. तर ‘दबंग 2’मध्ये करिनाचे ‘फेविकॉल से’ हे आयटम साँग होते. ‘दबंग 3’मध्ये अशाच एका आयटम साँगसाठी करिना हीच अरबाजची पहिली पसंत असल्याचे कळतेय. करिना व अरबाजची ताजी भेट याचसाठी होती, असे कळतेय.


  ‘दबंग 3’मध्ये सलमान खान, सोनाक्षीसोबतच महेश मांजरेकरची मुलगी अश्वनी मांजरेकर महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.  अर्थात चित्रपटातील उर्वरित कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. येत्या मार्चमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे.  खरे तर सलमान खान २०१८च्या अखेरिस ‘दबंग 3’ चे शूटींग सुरू करणार होता. ‘भारत’ आणि ‘दबंग 3’  हे दोन्ही चित्रपट एकाचवेळी शूट करण्याचा सलमानचा प्लान होता.   पण ‘रेस3’ रिलीज झाल्यानंतर सलमानने अचानक आपला प्लान बदलला आणि केवळ ‘भारत’चे शूटींग सुरू केले. असे का? तर सलमान खान एका वेळी केवळ एकाच चित्रपटावर लक्ष देऊ इच्छित होता. त्यामुळे त्याने  केवळ ‘भारत’चे शूटींग सुरू केले. या चित्रपटाचे शूटींग संपल्याबरोबर तो ‘दबंग 3’चे शूटींग सुरू करेल,असे अरबाजने नकतेच एका मुलाखतीत सांगितले होते. ‘दबंग 3’मध्ये सलमान व सोनाक्षी सिन्हा यांच्याशिवाय आणखी एक अभिनेत्री महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या हिरोईनचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. 

Web Title: kareena kapoor khan will do item number in dabangg 3 after fevicol se

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.