'..म्हणून मी सैफसोबत लग्न केलं'; करीनाने सांगितलं १० वर्ष मोठ्या सैफसोबत लग्न करण्याचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 07:35 PM2023-03-24T19:35:06+5:302023-03-24T19:36:16+5:30
Kareena kapoor: ज्या काळात एकही अभिनेत्री लवकर लग्न करायला तयार नव्हती. अशा काळात मी लग्न केलं, कारण..
बॉलिवूडची लोकप्रिय जोडी सैफ अली खान (saif ali khan) आणि करीना कपूर खान (kareena kapoor-khan) सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. यात बऱ्याचदा त्यांच्या वयातील अंतरामुळे ते चर्चेत येतात. यावेळीदेखील करीना तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच करीनाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने १० वर्ष मोठ्या असलेल्या सैफ अली खानसोबत लग्न का केलं या मागचं खरं कारण सांगितलं आहे.
अलिकडेच करीनाने ई टाईम्सला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफविषयीदेखील अनेक गोष्टींवर भाष्य केलं. यात सैफसोबत लग्न करण्यामागे एक खास कारण होतं असं तिने सांगितलं. ज्या काळात एकही अभिनेत्री लवकर लग्न करायला तयार नव्हती. अशा काळात मी लग्न केलं. माझी इच्छा होती त्यामुळेच मी लग्न केलं, असं करीनाने या मुलाखतीत सांगितलं.
"त्या काळात एखाद्या अभिनेत्रीने लग्न करणं ही फार मोठी बाब समजली जात होती. पण, आता काळानुसार सगळं बदलत चाललं आहे. तुम्हाला तुमच्या वयाची लाज वाटायला नको. आज प्रत्येक महिला सक्षम, धाडसी झाली आहे. त्यामुळे त्या तितक्याच धाडसाने एखादा निर्णय घेतात. आणि, आता तुमच्या वैवाहिक जीवनाचा तुमच्या करिअरवर फारसा परिणाम होत नाही. आता अनेक चित्रपट निर्माते जोखीम पत्करून वेगवेगळ्या लोकांना संधी देत आहेत. अनेक अनेक संधीही निर्माण होताना दिसत आहेत", असं करीना म्हणाली.
पुढे ती म्हणते, "त्या काळात मला लग्न करायची इच्छा होती त्यामुळेच मी सैफसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला."
दरम्यान, करीना आणि सैफने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. परंतु, वयाने १० वर्ष मोठ्या असलेल्या सैफसोबत लग्न केल्यामुळे करीनाला मोठ्या प्रमाणावर टीकेचं धनी व्हावं लागलं. सैफ आणि करीनाला तैमुर आणि जहांगीर ही दोन मुलंदेखील आहेत.